गावचा सर्वांगीण विकास साधावयाचा असेल तर सर्व गावकऱ्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज- सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे

लोहा ;आलेगाव ता.लोहा येथे बळीराजा महोत्सव कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे उपस्थित होत्या या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील उपस्थित होते.यावेळी सर्वप्रथम आमदार श्यामसुंदर शिंदे  यांच्या स्थानिक विकास निधीतून पेव्हर ब्लॉक कामाचे लोकार्पण करण्यात आले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जाऊन त्यांच्या स्मुर्तीस विनम्र अभिवादन करण्यात आले .

 

 

यावेळी बोलताना आशाताई म्हणाल्या की,आपल्या गावाचा विकास साधायचा असल्यास म्हणजे स्वच्छ्ता,रस्ते,शाळा इत्यादी व इतर अनेक गोष्टीसाठी सर्वांनी गट तट,जात पात,पक्षभेद सोडून एकत्र येणे गरजेचे आहे तुम्ही सर्वजण जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत गावचा सर्वागीण विकास साध्य होणार नाही आपण नक्कीच गावच्या विकासासाठी एकत्र याल अशी अपेक्षा करते असे यावेळी आशाताई म्हणाल्या याप्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने आशाताई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला  .

 

 

यावेळी लोकसहभागातून गावचा विकास साधायचा याबद्दल उत्कृषटरित्या मार्गदर्शन भास्करराव पेरे पाटील यांनी केले याप्रसंगी सरपंच बळवंत पाटील,उपसरपंच सारजाबाई पाटील मोरे,खुशाल पा मोरे,बळवंत पा मोरे,दिगंबर आंबटवड,नागोराव पा मोरे,दादाराव पा मोरे,मारोती मोरे, सज्जनराव पा मोरे,वसंतराव पा मोरे,गिरीश डीगोळे,सतीश पा कराळे,सरपंच संजय फुलवळे,सचिन झडते,कपिल झडते,गंगाधर चिखलीकर,दत्ता पा शिंदे,मगदूम शेख दहिकलंबेकर,राम मोरे,विशाल कौसल्यें,कचरू बंडेवाड,सह कार्यकर्ते,महिला व गावकरी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *