नांदेड ; पत्रकार आणि पत्रकारितेची जाण आणि भान असणारे ज्येष्ठ पत्रकार ,आमचे मार्गदर्शक, जुन्या आणि नव्या पिढीतील पत्रकारांच्या वैचारिक भूमिकेचे सेतू, आदरणीय गोवर्धन शेठ बियाणी यांची मराठी पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनस्वी जाहीर अभिनंदन.!!
शहरी आणि ग्रामीण भागातील शेवटच्या टोकाच्या पत्रकाराच्या सुख – दु:खात स्वत सुख-दुःख समजून सहभागी होणारे गोवर्धन बियाणी हे खऱ्या अर्थाने पत्रकारितेतील जाणते पत्रकार आणि संपादक आहेत असे म्हटल्या वावगे ठरू नये.
पत्रकारांच्या हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या गोवर्धन बियाणी यांच्याकडे आपली समस्या, प्रश्न घेऊन गेलेल्या जुन्या अथवा नव्या पत्रकारांना त्यांनी सहकार्य केले नाही असे क्वचितही झालेले नसावे. “_ त्याचं काही नाही ,ते होऊन जाईल” इतक्या सहजतेने आपल्याकडे आलेल्या पत्रकाराच्या पाठीवर विश्वासाची आणि बलदंड बळकटीची थाप देणारे, खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहणारे गोवर्धन बियाणी यांची जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड खऱ्या अर्थाने जिल्हाध्यक्ष पदासाठी सार्थ ठरते आहे.
कुणाला हॉस्पिटलसाठी मदत, कुणाला शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे काम करून द्या म्हणून शिफारस, एखाद्याला पत्रकारितेत काम.करण्याची इच्छा असेल तर त्याला उभ करण्यासाठी जी जमेल ती मदत, काही जणांना घर बांधण्यासाठी , घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर काही जणांना प्लॉट खरेदीसाठी आर्थिक मदतीसाठी कुबेर होऊन उभे राहणारे गोवर्धन बियाणी सर एखाद्याला मोबाईल घेऊन देण्यासाठीही मदतीचा हात पुढे करतात ही त्यांच्यातील संवेदनशील माणुसकी प्रत्येकाला त्यांच्याकडे आकर्षित करते.निस्वार्थी, निगर्वी, निसंकोच, निर्भीड बियाणी सरानांची झालेली निवड पत्रकार संघाला निश्चितपणे नवी दिशा देईल हा विश्वास आहे.
त्यामुळे त्यांच्या हातून अधिकाधिक पत्रकारांचे कल्याण होओ, पत्रकारांचे अनेक प्रश्न त्यांच्या हातून सुटवेत यासाठी त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य मिळो ही राम तरटे आणि तरटे परिवाराकडून मनस्वी शुभेच्छा.
पुनश्च सर अब अभिनंदन !!
राम तरटे , नांदेड