लफडी / बाजार / प्रेम…??..

सोशल मिडीयावरील किस्से ऐकले की , हादरुन जायला होते… लग्न संस्कृती टिकेल का असा प्रश्न पडतो.. लग्न झालेली असुन बाहेर प्रत्येकाच्या जोड्या आणि ते फक्त मित्र असतील तर ठिक आहे पण त्याही पुढे जाऊन ही नाती जेव्हा वेगळ्या वळणावर असतात आणि त्यातुन घरात दुर्लक्ष होतं ..

घरात आपला नवरा किवा बायको किवा मुलं किवा आई वडील वाट पहात असतात याचही भान या मंडळीना नसतं.. घरात शरीरसुख मिळत नाही म्हणुन की बदल म्हणुन .. प्रेम ,,वासना की फॅशन ?? .. जो तो कौतुकाने सांगतो , माझा घटस्फोट झालाय आता मी याच्यासोबत आहे.. काही महिन्याने सो कॉल्ड प्रेमवीर दुसऱ्यासोबत दिसतात.. मित्र किवा मैत्रीण हवी असं मलाही वाटतं पण ही भयाण परिस्थिती पाहिली की जाणवतं आपल्या पुढच्या पिढीत काय असेल ?? .. आपण सावरु शकु का स्वतःला ?? .. फोनवरुन ग्रूप्सवरुन अनेक नाती एझीली जोडली जातात आणि एक मुलगा अनेक मुलीना डेट करत असतो किवा एक मुलगी अनेक मुलांना चुना लावत असते.. ( वेगवेगळ्या रुपात ) .. काही वेळा खुप चांगली नाती पहायला मिळतात पण त्याचं प्रमाण खूपच कमी आहे..

भाऊ मानणे , बहीण म्हणणे आणि प्रत्यक्षात काहीतरी वेगळच.. नक्की आपण कुठे कमी पडतोय.. शिक्षण आहे ,पैसे आहेत मग संस्कार कमी पडत आहेत का ?? .व्यसनांचं वाढणारं प्रमाण त्यात स्त्रीयाही कमी नाहीत..खूपच वाईट वाटतं.मला वाटते एकत्र कुटुंब पध्दती परत यायला हवी .. नात्यात संवाद व्हायला हवा जो होत नाही.. त्यामुळे बाहेरची माणसे जवळ वाटत आहेत का ?? अजूनही वेळ आहे.. मी नेहमी म्हणते ,,बदल हवा पण त्याचं रुप भयाण नसावं ..
नात्याना मर्यादा हवी आणि मॅरीड आहोत याचं भानही असावं..

सोनल गोडबोले
लेखिका ,अभिनेत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *