कंधार ;कायाकल्प कार्यक्रम अंतर्गत कंधार ग्रामीण रुग्णालयास 2021-22 चा राज्यस्तरीय कायकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे.आदरणीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ सूर्यकांत लोणीकर यांच्या प्रभावी प्रशासनामुळे रोख एक लाख रुपयाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात मानाचा तुरा रोवला गेला आहे व कर्मचारी वर्गाचे मनोबल उंचावले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ‘गुणवत्ता आश्वासन’ कायाकल्प कार्यक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या एका पथकाकडून कंधार ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून परिसर स्वच्छता, संसर्ग नियंत्रण कचरा व्यवस्थापन ,आंतरुगण व बाह्यरुग्णांची काळजी, प्रसूतीगृह विभाग, शस्त्रक्रियागृह ,अपघात विभाग, माता व बाल संगोपनगृह, लसीकरण जनजागृती, औषधे, सर्व रेकोर्ड , कागदपत्रे व साहित्य आदी निकषांचे परीक्षण करण्यात आले होते.
कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांच्या वेळोवेळी च्या मार्गदर्शनामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश पोकले डॉ.राजू टोपे,डॉ पोरे, आधी परिचारिका शितल कदम , व कार्यक्रम प्रमुख राजश्री इनामदार, शिल्पा केळकर, अश्विनी जाभाडे, पल्लवी सोनकांबळे ,मयुरी रासवते, योगेश्वरी कबीर ,प्रशांत कुमठेकर, विष्णूकुमार केंद्रे, आदिसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची राज्य शासनाने दखल घेऊन कंधार ग्रामीण रुग्णालयास दुसऱ्यांदा ‘कायाकल्प’ पुरस्कार जाहीर केला आहे. मागच्या वर्षापेक्षा या वर्षी अधिक अधिक कटाक्ष ठेऊन सुधारणा केली, ग्रामीण रुग्णालयात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले, व रुग्णालय परिसरात झाडे वाचविण्यासाठी उद्यानाची निर्मिती केली, व उद्यानाला गेट बसविण्यात आले रुग्णांलयात जनरेटरची व्यवस्था केली तसेच पाणी शुद्धीकरण आरो बसविण्यात आले आणि रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाना बसण्यासाठी व त्यांच्या मनोरंजनासाठी टेलिव्हिजनची व्यवस्था करण्यात आली,
भविष्यात साथीच्या रोगामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून ऑक्सिजन प्लान्टची सुविधा उपलब्ध करून दिली.यामुळे कंधार येथील जनतेचा प्रतिमा व त्यांचे ग्रामीण रुग्णालया बाबतचची प्रतिमा व मत आणि चांगले अभिप्राय मिळाले आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचे नाव जिल्हा स्तरावर उंचावले आहे.रोख एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दर्जेदार रुग्णसेवेमुळे हा पुरस्कार मिळाला. यात वैद्यकीय अधिकारी आधीपरिचारिका व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर साहेब यांनी नेहमीच डॉ. सूर्यकांत लोणीकर यांचे कौतुक केले वरिष्ठ अधिकारी यांच्या ग्रामीण रुग्णालयात भेटी झाल्या तेंव्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक सर्व बाबी कडे लक्षय दिल्यामुळे व संस्था विकसीत केल्यामुळे डॉ.सूर्यकांत लोणीकर यांचे कौतुक केले, जिल्हा कार्यक्रम प्रमुख डॉ वेंकटराव गुडे साहेब यांनी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले. डॉ.राम आव्हाड साहेब (निवासी वैद्यकीय अधिकारी बीड),राज्यस्तरीय कायाकल्प पथकांचे मुख्य अधिकारी डॉ.बापू निकाळजे साहेब ( जिल्हा गुणवत्ता आश्वासन सुपरवायझर बीड) आणि डॉ.अर्चना तिवारी मॅडम ( कायाकल्प जिल्हा प्रतिनिधी) यांचे मार्गदर्शन लाभले त्यांचे सर्व अधिकाऱ्याचे पथक यांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहाणी केली.
अधिकाऱ्याचे पथक हे राज्यस्तरीय कायाकल्प पथक होते.हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हा शल्यशिक्षक डॉ. निळकंठ भोसीकर साहेब तसेच डॉ.राम आव्हाड साहेब (निवासी वैद्यकीय अधिकारी बीड), राज्यस्तरीय कायाकल्प पथकांचे मुख्य अधिकारी डॉ.बापू निकाळजे साहेब ( जिल्हा गुणवत्ता आश्वासन सुपरवायझर बीड) आणि डॉ.अर्चना तिवारी मॅडम ( कायाकल्प जिल्हा प्रतिनिधी) यांनी सर्व बाबीकडे लक्ष दिल्यामुळे व संस्था विकसित केल्यामुळे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सूर्यकांत डॉ लोणीकर साहेबांचे विशेष कौतुक केले यांच्यासह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व अधिपरिचरिकांचे अभिनंदन केले आहे.