मान्यताप्राप्त शाळांना प्रत्येकी तीन वर्षांनी स्वमान्यता पत्र घेणे हे अन्यायकारकच – आमदार उमाताई खापरे

सोलापूर:– शाळांना शासनाची मान्यता असताना प्रत्येक तीन वर्षांनी आरटीई अंतर्गत स्वमान्यता पत्र घेणे हे अन्यायकारकच आहे ही जाचक अट रद्द करण्यासाठी आपण विधान परिषदेत आवाज उठविणार असल्याचे परखड मत महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या राज्य कार्याध्यक्षा तथा आमदार उमाताई खापरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाची *राज्य कार्यकारिणी सभेचे व कर्तव्य बोध दिवस* कार्यक्रमाचे पुणे येथील श्री शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय कोंढवा बुद्रुक येथे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते

यावेळी व्यासपीठावर शिक्षक महासंघाचे प्रमुख मार्गदर्शक कां. रं. तुंगार, प्रकाश देशपांडे, अध्यक्ष राजेंद्र निकम, मुख्यसचिव विठ्ठल उरमुडे, राज्य संघटनमंत्री कृष्णा हिरेमठ, उपाध्यक्ष मू.न. तांबोळी, विजयकुमार देसले, हरिहर चिवडे, राजश्री तडकासे, सहसचिव अशोक मदाने, विकास थिटे, नारायण शिंदे, कोषाध्यक्ष दिनेश पाटील, हिशोब तपासणीस राहुल बोरुडे, मुख्याध्यापक प्रतिनिधी हेमंत कुमार पाटील, शिक्षकेतर प्रमुख देवेंद्र चौधरी, महिला प्रमुख रसिका परब, कार्यकारणी सदस्य शिवाजी भंडणकर, आर,बी.बाचनकर आदि पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शासन दरबारी प्रलंबित असलेले शाळांचे,शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे उमाताई खापरे यांनी सांगितले. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, वैद्यकीय कॅशलेस योजना लागू करणे, थकीत वेतन अदा करणे, आरटीई अॅक्ट नुसार प्राथमिक शाळांना 5 वी व 8 वी चा वर्ग जोडणे, बालवाडी शाळांना मान्यता देणे व बालवाडी शिक्षकांना सेवाशर्ती लागू करणे, नवीन शैक्षणिक धोरण त्वरित लागू करणे आदी प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे उमाताई खापरे यांनी सांगितले, या बैठकीत उपस्थित जिल्हा अध्यक्षांनी आपल्या जिल्ह्याच्या कार्याचा अहवाल सादर केला, सदर बैठकीत एप्रिल 2023 मध्ये रत्नागिरी येथे मुख्याध्यापक व लिपिकांचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचे ठरले. यावेळी मार्गदर्शक कां,रं,तुंगार, राज्य संघटनमंत्री कृष्णा हिरेमठ, अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रामध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय संघटनमंत्री महेंद्रजी कपूर यांनी कर्तव्य बोध दिवस निमित्त सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमुख शेखर चंद्रात्रे व शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष किरण बावठणकर उपस्थित होते. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या वतीने *12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती ते 23 जानेवारी सुभाषचंद्र बोस जयंती या कालावधीत संपूर्ण देशात संघटनेच्या वतीने कर्तव्य बोध दिवस* साजरा करण्यात येतो यानिमित्त कर्तव्य भावनेची जाणीव जागृती केली जाते, महेंद्रजी कपूर यांनी अत्यंत मौलिक मार्गदर्शन यावेळी केले,संघटनेची त्रिसूत्री *राष्ट्र की हित मी शिक्षा,शिक्षा के हित मी शिक्षक, और शिक्षक के हीत मे समाज* या ध्येयाने सर्वांनी काम करण्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले,प्रास्ताविक मुख्य सचिव विठ्ठल उरमुडे यांनी केले तर आभार दीपक वळसेपाटील यांनी मांनले.

(या बैठकीत नागपूर शिक्षक मतदार संघातून निवडून निवडणूक लढवीत असलेले महासंघाचे मार्गदर्शक नागो गाणार मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवीत असलेले ज्ञानेश्वर म्हात्रे व नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून लढवीत असलेले सत्यजित तांबे यांना शिक्षक महासंघाचा जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *