मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कंधार शहरात समूह राष्ट्रगान चे आयोजन

कंधार ; मराठवाडा मुक्तिसंग्रामास ७५ वर्ष पूर्ण होत आहेत त्या अमृतमहोत्सवाच्या अनुषंगाने दि २६ जानेवारी रोजी कंधार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समूह राष्ट्रगान ध्वजारोहना चे आयोजन करण्यात आले आहे या समूह राष्ट्रगानास कंधार शहरातील सर्व शाळा, कॉलेज, महाविद्यालयातील विद्यार्थी व कंधार शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले.

कंधार शहरांमध्ये १९९८ पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारतमाता पूजनाचे आयोजन केले जाते, १९९८ ते २०२३ म्हणजेच तब्बल २५ वर्ष अविरतपाने भारतमाता पुजन केले जाते, २०२३ रोजी भारत माता पूजनास२५ वर्षे पूर्ण होत आहेत त्याचबरोबर मराठवाडा मुक्ती संग्रामास ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने या अनुषंगाने कंधार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि २६ जानेवारी सकाळी आठ वाजता समूह राष्ट्रगान व ध्वजारोहण चे आयोजन करण्यात आले आहे, या समूह राष्ट्रगान कार्यक्रमास शहरातील सर्व कॉलेज , महाविद्यालय,शाळा शाळेतील विद्यार्थी तसेच शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अड गंगाप्रसाद यन्नावार यांनी केले आहे..

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *