गंगामाता प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिन साजरा…..! प्रशासन चालवण्याचा विद्यार्थ्यानी घेतला अनुभव

कंधार/प्रतिनिधी

शहरातील श्रीमती गंगाबाई (गंगामाता ) बालक मंदिर व प्राथमिक शाळेत विध्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन सोमवारी दि. २४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे शाळेचे मुख्याध्यापक हाजी मोहम्मद ए. जी यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून स्वयंशासन दिनाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम दोन सत्रात घेण्यात आला पहिल्या सत्रात स्वयंशासन दिनाच्या तासिका घेण्यात आल्या तर दुसर्‍या सत्रात शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी स्वयं शासन दिनी सहभागी झालेल्या शिक्षकांचे मनोगत घेण्यात आले. मुख्याध्यापक म्हणून विश्वजीत केंद्रे याने तर उप मुख्याध्यापक हणमंत फुले यांनी उत्तम अश्या पद्धतीने शालेय कामकाज आणि एक दिवसीय प्रशासन चालवले.

विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनातील सहभाग हा केवळ शिक्षक होण्याचा अनुभव देणारा नसून, भविष्याला आकार देणारी रूची, कला दर्शविणारे एक प्रतीक असते. मुख्याध्यापक, शिक्षक, लिपीक, सेवक व विद्यार्थी यांच्या तांत्रिक सुसंवादाची जाणीव निर्माण होते. स्वयंशासन हा एकदिवसीय अनुभव अन् आनंद वाढवणारा असतो. तसेच भविष्यात यशाची दिशादर्शक ठरतो म्हणून विद्यार्थ्यांनी ही आठवण आयुष्यभर जपतो.

या वेळी विद्यार्थ्यांनी प्रथमच शिक्षक म्हणून भूमिका पार पाडताना जबाबदारीने संपूर्ण दिवस शाळा सांभाळली. आज शिक्षक म्हणून श्रावणी कागणे,राजनंदनी वाघमारे, नंदनी देवकांबळे, तेजश्विनी लाडेकर ,प्रगती लाडेकर, श्रेया जायभाये,महेश तेलंगे,जनक तेलंग,आर्यन डांगे,कृष्णा भिकणार,कृष्णा जाधव, ऋषिकेश राठोड,साईप्रसाद जोगपेठे यांनी अध्यापन कार्य केले,तर सेवक म्हणून आर्यन कांबळे,मारोती गायकवाड यांनी आपली जबाबदारी पार पडली. मुलांनी दिवसभर अध्यापण ते शालेय कामकाजाची पाहणी शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद अन्सारोद्दीन यांच्या मार्गदर्शनाखली सहशिक्षक संतोष कांबळे, माधव गोटमवाड यांनी केली. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले अनुभव निरोपाच्या वेळी कथन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक मोहम्मद ए. जी, उपमुख्याध्यापक केंद्रे बी.एम, श्रीमती केंद्रे एम.एस,श्रीमती शेंडगे एस.जी, कांबळे संतोष, सुनील राठोड, माधव गोटमवाड, काकंडे प्रकाश, सौ. लता बैनवाड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सहशिक्षक माधव गोटमवाड तर आभार संतोष कांबळे यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *