देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्यांना आपण विसरत चाललो आहोत काय? आजची मुले अत्यंत भाग्यवान आहेत, कारण ते स्वातंत्र्यात जन्मले असून त्यांना पारतंत्र्य माहीत नाही,आपल्या पूर्वजांनी ,क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन फार हाल सोसले, तुरुंगवास भोगला याची कल्पना नवीन पिढीला नाही, म्हणून क्रांतिकारकांचे विस्मरण होऊ नये, भारतीय स्त्रियांना चूल आणि मूल एवढेच माहिती होते पण स्वातंत्र लढ्यात सहभाग घेण्यासाठी शौर्यशाली वीरांगणा कल्पना दत्त पुरुष वेष धारण करून स्फोटके घडून आणले, किती ही धाडस,ब्रिटिश सत्तेशी टक्कर देणे म्हणावे तेवढे सोपे नव्हते तरी या तरुणींने जीवाची पर्वा न करता देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी देह झिजविला त्यांचे कौतुक करावे तेवढेच थोडेच आहे ,जर आपण आपल्या पूर्वजांना,थोरांना,
शूरावीरांना,क्रांतिकारकांना विसरलो तर आपली अवनती होईल,नवीन पिढीला हा स्फूर्तीदायी,रोमांचकारी व संघर्षशील सशस्त्र स्वातंत्र्य लढा कळण्यासाठी त्यागाने भरलेला व प्रेरणा देणारा इतिहास सर्वांना कळणे अतिशय महत्त्वाचे आहे. क्रांतिकारी चळवळी ह्या फक्त पुरुषासाठीच होत्या,असे नाही तर वीना दास, शांती घोष, सुनीती चौधरी व कल्पना दत्त सारख्या शौर्यशाली महिलाही त्यामध्ये सामील झाल्या त्यांचा इतिहास समजावून घेणे काळाची गरज आहे. म्हणूनच हा लेखन प्रपंच……..
क्रांतिकारक कल्पना दत्त यांचा जन्म बंगाल प्रांतातील चितगांग मधील श्रीपुर येथे 27 जुलै 1913 रोजी झाला, त्यांच्या आईचे नाव शोभनादेवी तर वडिलांचे नाव विनोद बिहारी दत्त असे होते , लहानपणापासूनच त्या अतिशय धाडसी होत्या,1928 मध्ये कलकत्त्यातील छात्र संघटनेची स्थापना कल्याणी दास हिले यांनी केली, या संस्था क्रांतीकारकांच्या भरतीचे व प्रशिक्षणाचे केंद्र बनली, येथेच कल्पना दत्त या ही सामील झाल्या,
तलवार चालवणे, दाडंपट्टा फिरवणे,सूर मारणे, सायकल चालवणे असे अनेक प्रशिक्षण त्या ठिकाणी घेतल्या, एका बाजूला महात्मा गांधीजी यांनी असहकार, सविनय कायदेभंग , खिलाफत या अहिंसात्मक चळवळी सुरू केल्या होत्या, परंतु देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी दुसरीकडे सशस्त्र क्रांती करून लवकरात लवकर भारताला स्वातंत्र्य मिळून द्यावे, यासाठी अनेक क्रांतिकारी महिलांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली, भारतातील बंगाल या प्रांतातील शौर्यशाली महिला क्रांतिकारक कल्पना दत्त यांनी चितगाव शस्त्रागार लुटणाऱ्या क्रांतिकारकांची तुरुंगातून मुक्तता करण्यासाठी त्यांनी तुरुंगांच्या भिंती स्फोट करून उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो अपयशी झाला,
त्यांचे हे धाडस भारतीयांच्या सदैव स्मरणात राहणारे आहे, चितगांग गटाने केलेल्या प्रचार सर्वत्र झाल्यामुळे कल्पना दत्त व प्रीतीलता वडेड्दार या दोघींनी क्रांतिकार्यात सहभाग घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला, कलकत्ता येथे राहणारे मनोरंजन रॉय या नेत्यामार्फत मास्टर सूर्यसेन यांनी कल्पना दत्तला बेथून कॉलेज सोडून चितगांगच्या एखाद्या कॉलेज मध्ये प्रवेश घ्यावे असा संदेश पाठवण्यात आला या विनंतीला मान देऊन कल्पना दत्त या कटात सामील व्हायचे ठरविले बेथून येथील कॉलेजमधून इंटरमिजिएट विज्ञानाच्या अभ्यासा साठी चितागांग येथे येऊन महाविद्यालयात प्रवेश घेतली. बॉम्बस्फोटासाठी लागणारे साहित्य तयार करण्याची कामगिरी कल्पना दत्त यांच्याकडे देण्यात आली त्यांच्या सोबतीला अनंतसिंग हा सल्लागार होता,
कल्पना बॅनर्जीवर रेणु राॅय या वस्तीगृहातील मैत्रिणीच्या मदतीने कलकत्ता येथून नायट्रिक अॅसिड व सल्फ्युरिक अॅसिड त्या मागीत असत अॅसिडमध्ये भिजवलेले कापड व काही स्फोटके तयार करण्यात येत असे ,निवारण घोष व नाणीदास ही कल्पना दत्तच्या मार्गदर्शनाखाली शील बंद केलेल्या अॅसिडच्या बाटल्या पोलिसाची नजर चुकून ट्रक मधून चिंतागांगला आणण्यात असत, जेव्हा घरावर धाड टाकण्यात आले, त्यात रंजितसेन शहीद झाले, त्यांची बहीण मृणालांनी सेन कल्पना दत्तची मैत्रिणी होती, तिने अनंत सिंग यांनी पाठवलेल्या पत्रातून श्रीपूरमध्ये भिजवलेले कापड कसे तयार करीत असतात हे मृणालिनी सेन यांनी सांगितले आहे, कल्पना दत्त ही विज्ञान विषयाची विद्यार्थिनी आहे म्हणून कोणीही तिची चौकशी सुद्धा केली नाही, कारण विज्ञानाची प्रात्यक्षिक करत असेल? असे घरातील लोकांना वाटले,
पण इकडे शक्तिशाली स्फोटक फार मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आली होती, त्यातील काही तुरुंगात पाठवून तेथे पुरली होती, तर काही शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी वेगवेगळ्या चौकात पुरून ठेवण्यात आली होती, बॉम्ब प्रज्वलित करण्यासाठी वीजेच्या तारा जोडण्याची कामगिरी कल्पना दत्तवरच टाकण्यात आली,
याच काळात पोलीस दिवस -रात्र सावधगिरीने वागत होते जे लोक त्रास देतात त्यांना तुरुंगात टाकत असत, संशय आल्यास त्यांची चौकशी करत असत, अचानक काही कारणामुळे ही योजना असफल ठरली, कल्पना दत्त कॉलेजमध्ये किती वाजता येतात व घरी केव्हा जातात याची पोलिसांनी खात्री करून घेतली ,कल्पना दत्त या अतिशय बुद्धीमान व चाणाक्ष असल्यामुळे त्यांनी त्यांचा मार्ग चालू ठेवला आणि पोलिसांना संशय येणार नाही याची खात्री केली, मास्टर सुर्यसेन या क्रांतीकारकांचा त्यांच्यावर प्रभाव पडलेला होता, प्रीतीलता आणि कल्पना दत्त यांच्यात पोलिसाची व लष्कराशी अनेक वेळा झटापटी झाल्या होत्या,
कल्पना दत्त एवढ्या शौर्यशाली होत्या की त्या पुरुषी पोशाखात मास्टर सूर्यसेनला भेटण्यासाठी जात होत्या, याच काळात महात्मा गांधीजींनी तीन गोलमेज परिषदा सुरू केल्या, आणि दुसरीकडे क्रांतिकारकांनी इंग्रज सरकारने भंडावून सोडले,त्यामुळे हुतात्मा भगतसिंग,राजगुरू, सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली होती त्यातच 1932 साली भारतात सर्वत्र क्रांतिकारी चळवळीने जोर धरला होता त्यातून कल्पना दत्त फरारी म्हणून घोषित झाल्या परंतु भारताला एक फितुरीचा कलंक लागलेला आहे यातून तात्या टोपे, उमाजी नाईक यांना जीव गमवावा लागला तसेच नेत्रा सेन या शेजारी राहणाऱ्या महिलेने फितुरी करून पोलिसांची संपर्क साधला आणि पोलीसांशी झटापट करताना कल्पना दत्त निसटून जाण्यात यशस्वी ठरल्या, परत काही दिवसांनी कल्पना दत्त आश्रयासाठी गहिरा या गावी आल्या तेथून मास्टर सूर्यसेनना सोडविण्यासाठी भरपूर योजना आखल्या परंतु त्या सफल झाल्या नाहीत, त्यामुळे गहिरा येथेच 19 मे 1933 मध्ये कल्पना दत्त व लष्कर यांच्यात झटापट झाली आणि अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले तेव्हा त्या स्वतःहून लष्कराच्या स्वाधीन झाल्या, गहिरा व चकमक झालेले ठिकाण हे पाच मैल अंतरावर होते, कल्पना दत्त यांना पकडून लष्करी तळापर्यंत चालत नेण्यात आले,
हे दृश्य पाहत असताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले शेवटी 20 मे 1933 रोजी कल्पना दत्त यांना तुरुंगात टाकण्यात आले, त्यांच्यासोबत असणारे दस्तगीर व सूर्यसेन,तारकेश्वर यांच्यावरील खटले एकाच वेळी सुरू झाले. मास्टर सूर्यसेन व दस्तगीर यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली, कल्पना दत्त ही तरुण महिला असल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली, हिजली या ठिकाणच्या कारागृहात त्यांना ठेवण्यात आले, नंतर तुरुंगात महारोगी लोकाजवळ राहण्याची सोय केली, त्यामुळे त्यांना मानसिक यातना भोगावे लागल्या हा सगळा अनुभव मनाला सुन्न करणारा आहे, तरी त्यांचे मनोधैर्य खचले नाही, त्या डगमगल्या नाहीत,
*वंदे मातरम्* व देशभक्तीपर गीते मोठ-मोठ्याने कल्पना दत्त तुरुंगात म्हणत असत, त्यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व गुरुदेव रवींद्रनाथ टागोर व कल्पना दत्त च्या वडिलांनी 1 मे 1939 मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका केली, चितगांग येथे आल्या आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्य हाती घेतले जन संघटना तर्फे देशभक्ती जागृत केली ,महिलांच्या संघटना उभारल्या,गुलामगिरीत राहणे किती अन्यायकारक आहे हे त्यांनी
सांगितले, बंगालमधील चितगांग येथे महाभयंकर दुष्काळ पडलेला होता, त्यात अनेक माणसे मरण पावली,
तेव्हा कल्पना दत्त यांनी संकटात सापडलेल्या लोकांची सेवा केली 1943 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव श्री प्रकाश चंद्र जोशी यांच्याबरोबर विवाह केला,1975 हे वर्ष भारत सरकारने महिला वर्ष म्हणून साजरी केले त्या निमित्ताने कल्पना दत्तचे पेन्शन दुप्पट केले गेले,तसेच 24 सप्टेंबर 1979 मध्ये पुणे येथे त्यांना वीर महिला म्हणून उपाधी देऊन सन्मानित केले गेले, तसेच मजुराच्या शिबिरात व किसान सभेस पूर्ण वेळ देऊन सहकार्य करू लागल्या, पुढील काळात अखिल भारतीय रशियन भाषा संस्थेशी त्यांचा अनेक वर्षे संबंध आला, बुद्धिमान आणि जिज्ञासू कल्पनाने महान शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते
आपल्या घरचे लोक सुद्धा परदेशी कापड वापरतात, व सत्कार स्वीकारतात हे पाहुन त्यांच्या मनाला फार वाईट वाटत, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती प्रज्वलित झाली असे त्यांनी म्हटले आहे, कल्पना दत्त सारख्या महिलांनी मातृभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्याच्या हेतूने काही आदर्शवाद स्वीकारल्यामुळे त्या हिंसक मार्गाकडे गेलेल्या आहेत,
भारतभूमीसाठी चितगांग मधील पहिली मुलगी फाशी जाण्याची संधी हुकली आहे असे त्यांनी आपल्या आठवणीत लिहून ठेवले आहे, अशा महान शौर्यशाली वीरांगणाचे 8 फेब्रुवारी 1995 मध्ये कलकत्ता येथे निधन झाले, आणि एक धगधगता निखारा शांत झाला, 2010 मध्ये आशुतोष गोवारीकरने त्यांच्यावर चित्रपट प्रदर्शित केला असून त्याचे नाव *खेले हम जी जान से असे होते, कल्पना दत्त यांनी केलेल्या कार्याचे मोजमाप करणे खूपच अवघड आहे त्यांच्या जीवनाचा प्रवास हा त्यागाचा, वियोगाचा न्यायालयीन चौकशी आणि यातनांचा आहे त्यांनी कारावास भोगला,
पुरुषाच्या निकट सानिध्यात राहून काम केले त्यांचे यश अपयश मोजपट्ट्या वापरून मूल्यमापन करणे योग्य नाही, ज्यावेळी त्या मरण पावल्या तेव्हा वृत्तपत्रांनी छोट्याशा स्तंभात ही बातमी छापली तर दूरदर्शनने ही बातमी देण्यासाठी काही सेकंद खर्च केले नाहीत याची मनाला कुठेतरी खंत वाटते ,अशा कल्पना दत्तचे शौर्य, धैर्य आणि त्यांचा त्याग, साहस निर्भिडपणा, उच्च विचारसरणी यांच्यापुढे आपण नतमस्तक आहोत,