कंधार ; या जीवसृष्टीवर एकच ईश्वर आहे तो निर्गुण निराकार आहे.विश्वाच्या कल्याणासाठी तो सदैव प्रयत्न करत असतो जात,पंथ व धर्म ही मानवाने निर्माण केलेली संकल्पना आहे.जरी उपासना पद्धती सर्वांची वेगवेगळी असली तरी,सर्व धर्माची शिकवण एकतेची आहे असे प्रतिपादन राजयोगिनी ब्र. कु.शिवकन्या बहेनजी यांनी कंधार येथे सर्वधर्म संमेलनात केले.
प्रजापिता ब्रहमाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उपसेवा केंद्र कंधार च्या वतीने दि२२ फेब्रुवारी रोजी बालाजी मंदिर भवानी नगर येथे गोरज मुहूर्तावर सर्व धर्म संत संमेलन आयोजित करण्यात आले होते. या सर्व धर्म संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारी शिवकन्या बहेनजी संचालिका कैलास नगर नांदेड, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मठाधिपती 108 श्री गुरु नागेंद्र गयबी महाराज भारती मठ संस्थान पानभोसी, सरदार गोड सिंग महाराज, गुरुद्वारा हुजूर साहेब कारेगाव,मौलाना रफीउद्दीन परभणी , विलास कांबळे बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष कंधार , अभय पहाडे जैन प्रतिनिधी कंधार यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विलास कांबळे यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की जीवसृष्टीवरील सर्व प्राणी मात्रावर प्रेम, करुणा आपण केली पाहिजे यातून विश्वकल्याणासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत मानव सेवा ही च ईश्वरसेवा मानून आपण सर्वांनी काम केले पाहिजे असे ते यावेळी म्हणाले,
जैन संघटनेचे अभय पहाडे यांनी भगवान महावीराने व सर्व महापुरुषांनी आपल्याला एकतेचा संदेश दिलेला आहे या महापुरुषांच्या विचाराचे पालन करणे आपल्या सर्वांची कर्तव्य आहे त्यातूनच आपले कल्याण साधता येईल असे ते म्हणाले ,
ईश्वर निर्गुण निराकार आहे त्याचे स्वरूप जर आपल्याला जाणायचे असेल तर गुरूंनी सांगितलेले विचार अंगीकारणे आवश्यक आहे. असे गुरुद्वारा साहेब कारेगावचे सरदार गोड सिंग महाराजांनी सांगितले,
खुदा , ईश्वर, गॉड हे सर्व मानव जातीला दिशा देणारे आहेत आपण सर्व ईश्वराची लेकरे आहोत ईश्वर हा सर्वज्ञ आहे ईश्वरास अकार उकार असे काही नाही, ईश्वराने दिलेले विचार अंगीकृत करून विश्वकल्याणासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असेच विचार सर्व धर्म पंथ यामध्ये सांगितले आहेत ईश्वर ही कोणी व्यक्ती नाही तर तो सर्वव्यापी आहे,एक दिव्य ज्योती आहे त्यालाच आपण आपले प्रेरणास्त्रोत मानून विश्वाच्या कल्याणासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे
मौलाना रफीउद्दीन यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले
कोण्याही जिवाचा न घडो मत्सर वर्मे सर्वेश्वर पुजनाचे.. असा बहुमूल्य उपदेश जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपणास दिला त्याचबरोबर आपली संस्कृती वसुदेव कुटुंबकम सारे विश्वच माझे घर असे मानून चालणारी आहे या पृथ्वी तलावर राहणारा प्रत्येक व्यक्ती हा ईश्वराचा अंश आहे ईश्वराने आपल्याला ज्या उद्देशाने या ठिकाणी पाठवले आहे त्या उद्देश पूर्तीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे ,उद्देशीपूर्ती कोणती आहे ती जाण्यासाठी ईश्वर प्राप्ती करणे ,ईश्वराशी एकरूप होणे आवश्यक आहे, भेदाभेद न करता जातीपाती,धर्म या सर्व गोष्टींना बाजूला ठेवून ईश्वर एक आहे हे जाणून या मानव जातीच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन गुरु नागेंद्र गयबी महाराज यांनी सर्वधर्म संत संमेलना यावेळी केले
उपसेवा केंद्र कंधारच्या ज्योती बहेनजी यांनी ईश्वराशी एकरूप होण्यासाठी एकाग्रतेची आवश्यकता असल्याचे सांगून एकाग्रता करण्याची पद्धत, उपाय सांगितले उपस्थित सर्वांनी एकाग्र होऊन ईश्वरा च्या स्वरूपाची अनुभूती घेतली
विशेषतः या संमेलनावेळी विद्यार्थ्यांनी शिवशंकर चैतन्य झाकी साकारून उपस्थितांचे मन जिंकले
या संमेलनाचे प्रास्ताविक ज्योती बहिणजी यांनी केले तर सूत्रसंचालन दत्तात्रेय येमेकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवप्रेमा बहिण जी,बालाजी भाई , दिनकर भाई , मुत्तेपवार सर , शिवप्रिया बहिण सतीश भाई,श्रीकांत भाई,शिवभाई,ज्ञानोबा भाई ,मुलुख पाडे ,. त्रिंबक भाई, उदगीरे महादापुरे भाई शुभम भाई गणपत भाई समर्थ सर, म्हादापुरे भाई, शुभम भाई, गणपत भाई ,मलकु भाई,गौरव भाई,समर्थ वाडीकर सर,योगगुरु निळकंठ मोरे अँड गंगाप्रसाद यन्नावार,फड सर,चंद्रकला माता,संगीता माता ,चंद्रकला माता,अलका माता,चंदा माता ,लक्ष्मी माता, करुणा माता, शिवनंदा माता ,सत्यभामा माता,डॉ. डांगे मॅडम,नरंगले माता, तळणीकर माता, सीमा बहन, करुणा अक्षरा बहन,सृष्टी बहन,भार्गवी पार्थ ,अथर्व साईनाथ, आवळे माता इत्यादींनी कार्यक्रमाच्या सफलतेसाठी परिश्रम घेतले .