शिवप्रसाद ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट मुखेड येथे “बहिःशाल व्याख्यानमाला ” चे आयोजन करण्यात आले.

 मुखेड ; प्रतिनिधी

स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेड व आदिवासी शिक्षण विकास प्रसारक मंडळ, संचलित शिवप्रसाद ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट, मुखेड येथे दि : २३-०२-२०२३ रोज गुरुवार रोजी “बहिःशाल व्याख्यानमाला ” चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे विनित व अध्यक्ष श्री वसंत अण्णा संबुटवाड (सचिव, शिवप्रसाद ग्रुप इंस्टिट्यूट, मुखेड ) व श्री.डॉ. विरभद्र हिमगीरे(संचालक शिवप्रसाद ग्रुप इंस्टिट्यूट, मुखेड) हे होते.

 

 

या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. हाणमंत भोपाळे ( इंदिरा गांधी महाविद्यालय सिडको नांदेड) व प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. हरिदास राठोड (प्राचार्य ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर ), प्रा. डॉ. मदन गिरी ( बहिशाल व्याख्यानमाला प्रभारी प्राध्यापक), प्रा. डॉ. रामकृष्ण बदने ( प्रमुख उपस्थिती ), प्रा. डॉ. राम चेन्नुरी हे उपस्थित होते. नियोजित कार्यक्रमाचा विषय “महाराष्ट्रातील महापुरुषांचे योगदान” हा होता. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी डॉ. भोपाळे यांनी विध्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले, यामध्ये डॉ. भोपाळे यांनी विध्यार्थ्यांना महापुरुषांचे योगदान सांगितले व शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले, तर डॉ. हिमगीरे यांनी विध्यार्थ्यांना महापुरुषांबद्दल सांगत यशस्वी होण्याचे कानमंत्र दिले. सर्व मान्यवरांनी विध्यार्थ्यांना “महाराष्ट्रातील महापुरुषांचे योगदान” समजावून सांगत त्यांना शिक्षणाच्या वाटेवर चालण्यासाठी प्रव्रुत्त केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षकवर्ग व विध्यार्थ्यांनी हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पृथ्वीराज काळे सर व आभार प्रदर्शन अविनाश बंडे सरांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवर्ग यांनी परिश्रम घेतले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *