अशोकराव चव्हाण थेट बांधावर पोहोचले; शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची मागणी क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मुदखेड ; प्रतिनिधी

 

मुदखेड व अर्धापूर तालुक्यात सुनामीसारख्या सुसाट वादळी वाऱ्यांनी आणि अभूतपूर्व गारपिटीने क्षणात होत्याचे नव्हते झाले असून, गहू, टरबूज, खरबूज, हरबरा, केळी आदी पिके पूर्णतः उध्वस्त झाली आहेत. या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण तातडीने मुंबईहून थेट बांधावर पोहोचले व त्यांनी नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. राज्य सरकारने पंचनाम्यांची प्रक्रिया विनाविनंब पूर्ण करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आ. चव्हाण यांनी माजी आमदार अमरनाथ राजूरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे, कन्या श्रीजया चव्हाण , बाळासाहेब देशमुख यांच्यासह आज सकाळपासून अनेक नुकसानग्रस्त गावांमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुदखेड व अर्धापूर तालुक्यात ता. १६ (गुरुवार) रोजी वादळी वारे, पाऊस व गारपिटीने पिके अक्षरशः आडवी केली. अनेक गावातील पत्र्याची घरे व कच्च्या घरांची या नैसर्गिक आपत्तीत पडझड झाली आहे. अनेक घरांची चक्क छते उडून गेली आहेत. पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटाने निर्माण झालेली भयावह परिस्थिती आ. अशोकराव चव्हाण यांच्याकडे विषद करताना अनेक शेतकऱ्यांचा बांध फुटला व त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पीडितांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असून, नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, असा शब्दही माजी मुख्यमंत्र्यांनी दिला.

गुरूवारी आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे मुदखेड व अर्धापूर तालुक्यातील बारड, पाटनुर, निवघा, आमदूरा, वासरी, शंखतीर्थ, शेम्बोली, पांढरवाडी, दुधनवाडी, नागेली, तिरकसवाडी, पाथरड, डोंगरगाव, जवळा, खांबाळा, मुगट, बोरगाव नादरी, तिरकसवाडी आदी गावातील रब्बी, बागायती, फळबागा, वेलवर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीने संपूर्ण नांदेड जिल्हयात हाहाःकार उडाल्याने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला.

आ. चव्हाण यांनी शेतकरी बालाजी काशिनाथ संगेवार यांच्या केळीच्या नुकसानग्रस्त बागेची पाहणी केली. गारपिटीत उद्ध्वस्त झालेल्या पोलीस चौकीलाही त्यांनी भेट दिली. या दौऱ्यात काही ठिकाणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत देखील उपस्थिती होते.मारोतराव शंकतीर्थकर, जगदीश पाटील, उद्धव पवार, निलेश देशमुख, किशोर देशमुख बारडकर, माधव पाटील, नायब तहसीलदार संजय नागमवाड, ग्रामसेवक अनुपश्रीवास्त, माजी सरपंच विलास देशमुख, शेषराव दंडे, शेषराव फुलवले आदी मान्यवर या पाहणी दौऱ्यात सहभागी होते.

निवघा – येथील उत्तमराव पवार, त्रिंबक नरडले, दत्ता मोहनराव पवार, संभाजी नरडले, उद्धव पवार, विश्वनाथ संभाजी पवार, राजेश पवार, दिनेश पवार, गंगाधर राजेवार, संभाजी कोडगिरे, चेअरमन प्रकाश पवार, चक्रधर पवार, नारायण नरडले, नवनाथ शिंदे, शिवाजी शिंदे, प्रकाश कांचीनगिरे, संचालक शिवाजीराव पवार, श्रीराम पवार, पुरभाजी पवार, आनंदराव पवार, श्रीरंग आदी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले,

डोंगरगाव – येथील शंकराव व्यवहारे, शिवाजी कस्तुरे, कोंडीबा व्यवहारे , शिवानंद पुयड, गजानन व्यवहारे, नितेश ठाकूर, बालाजी व्यवहारे, राजेश व्यवहारे, माजी सरपंच श्रीनिवास महाद्वाड, सरपंच संजय सावंत, गणेशराव व्यवहारे, शिवानंद पुयड, मारोतराव व्यवहारे, व्यंकटी केदारे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

वासरी – सरपंच शिवानंद पाटील, नामदेव कांजाळकर, साहेबराव खानसोळे, माधवराव खानसोळे, रामशंकर उमाटे, दिगंबर खांनसोळे, दत्त रामजी कांजाळकर, भगवानराव कल्याणे, संभाजी राघोजी, कैलास गोविंदराव, विठ्ठल उमाटे या शेतकऱ्यांचे केळी, हरभरा, गहू, फुलशेती, भाजीपाल्यासह अनेक पिकांचं नुकसान झाले.

शंखतीर्थ – दिगंबर कदम, नरहरी कदम, सखाराम मोतीराम, गणेश बाबाराव, पळसराम कदम, गोविंद पुंड, नारायण सिंग वासरीकर, विक्रम कदम, प्रकाश किरकन, नारायण किरकन, सटवाजी किरकन, बालाजी पचलिंग, सरपंच शंकर बिचेवाड यांच्या शेतीचे नुकसान झाले.

बारड येथे प्रभाकर आप्पा भिमेवाड यांचे टरबुज, केळी, ज्वारी, डॉ शिंदे यांचे खरबुज, केळी तसेच इतर शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *