केसीआर यांचे किसान कनेक्शन ……! शेतकरी आंदोलनातील अनेक नेते बी आर एस च्या व्यासपीठावर ?

लोहा ;( एकनाथ तिडके )

 

तेलंगणात शेतकर्यांसीठी अनेक सुविधा उपलब्ध करुन देत किसान सरकार म्हणून प्रसिद्धीस आलेले बी आर एस पक्षाचे नेते मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी देशभरातील शेतकरी चळवळीतील शेतकरी नेत्यांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.महाराष्ट्रात पाऊल ठेवताच त्यांनी “अबकी बार किसान सरकार” असा नारा देत शेतकर्यांना साद घातली , पुढील देशभरातील पक्ष विस्ताराचा व राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू शेतकरी असतील हे अधोरेखित केले आहे , लोहा येथील सभेत राज्यातील तसेच देशभरातील अनेक शेतकरी नेते उपस्थित होते. याशिवाय शंकरआण्णा धोंडगे यांच्या माध्यमातून शेतकरी चळवळीतील अनेक नेते आगामी काळात बी आर एस पक्षात दाखल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार वामनराव चटप, व विदर्भातील नेत्यांचा समावेश आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील नेते गुरुनाम चढ्ढाणी, तसेच महाराष्ट्रातील शेतकरी नेते शंकरआण्णा धोंडगे, अहमदनगर येथील दशरथ सावंत,बाजीराव कदम, माणिकराव आदी अनेक शेतकरी नेते यावेळी बी आर एस पक्षाच्या व्यासपीठावर उपस्थित होते शिवाय महाराष्ट्रातील अजित नवले, यांच्या पायी आंदोलनाचा उल्लेख के चंद्रशेखर राव यांनी आपल्या भाषणात केला. याशिवाय देशभरातील सर छोटुराम, महेंद्रसिंग टिकैत, नमजुंडा स्वामी, शरद जोशी या शेतकरी नेत्यांच्या कार्याचा गौरव के चंद्रशेखर राव यांनी आपल्या भाषणात केला.
यावेळी के चंद्रशेखर राव यांनी आपल्या भाषणात देशभरातील शेतकरी नेते व त्यांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत त्या सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे संकेत दिले, साडेसातशे शेतकर्यांच्या मृत्यूवर न बोलणारे पंतप्रधान निवडणूक आली की शेतकर्यांची माफी मागतात मात्र अन्यवेळी शेतकर्यांना वार्यावर सोडले जाते. आम्ही महाराष्ट्रात आलो की येथील सरकार जागे होते अन्यवेळी शेतकर्यांना अडचणीत आणले जाते, असे सांगत महाराष्ट्र सरकारने गुलाबी झेंड्याची धास्ती घेतली असल्याचे ते म्हणाले. जगातील सर्वात जास्त शेतीयोग्य जमीन व मनुष्यबळ आपल्या देशाकडे असूनही शेतकर्यांचे जीवनमान का बदलले नाही?, दिडशे वर्षे विजनिर्मिती करु शकेल ईतका कोळसा देशाकडे असुनही का विज शेतकर्यांना दिली जात नाही? वाहुन जाणार पन्नास हजार टी एम सी पाणी अडवल नाही? असे प्रश्न उपस्थित शेतकर्यांना विचारत या सर्व बाबींचा विचार करुन मतदान करण्याचे आवाहन करत त्यांनी शेतकर्यांना साद घातली.

शंकरआण्णा धोंडगे यांच्या पक्षप्रवेशाचा बीआरएस पक्षाला फायदा

शेतकरी चळवळीतील महाराष्ट्रातील प्रमुख नाव असलेले शेतकरी नेते माजी आमदार शंकरआण्णा धोंडगे यांच्या बीआरएस पक्षातील प्रवेशाचा लाभ पक्षाला महाराष्ट्रात होणार आहे, शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात काम करत माजी आमदार शंकरआण्णा धोंडगे यांनी राज्यभर कार्यकर्ते निर्माण केले आहेत, कुठल्याही लाभाच्या पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी कायम शेती व शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून राजकारण केले आहे, शेतीमालाला भाव मिळावा, सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, २४ तास वीज मिळावी, यासह शेतकर्यांचे जीवन समृद्ध व्हावे यासाठी शंकरआण्णा धोंडगे यांनी पुर्ण हयात घालवली, आजच्या बीआरएस पक्षातील प्रवेशावेळीही शंकरआण्णा यांनी हा निर्णय का घेतला याविषयी शंका कुशंका उपस्थित केल्या गेल्या मात्र आपल्या राजकारणाचा मुख्य गाभा शेतकरी असुन शेतकर्यांसीठी बीआरएस पक्षाने जे काम केले ते महाराष्ट्र राज्यात व्हावे यासाठीच आपण प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

आगामी काळात शेतकरी सरकार, शेतकरी आमदार

आपली ताकद नाही का ? आपले सरकार येणार नाही का? शेतकरी आमदार खासदार होणार नाहीत का? असे प्रश्न विचारत के चंद्रशेखर राव यांनी आता आपले मत दुसर्यांना देऊन त्याच्या दारात भीक मागायला जायचे नाही तर तुम्ही आमदार खासदार व्हा, आणी आपण ते एकजुटीने करुन दाखवु असा विश्वास व्यक्त केला. तेलंगणा तील शेतकरी विकासाची पंचसूत्री महाराष्ट्रात राबवुन येथील शेतकरी आत्महत्या कमी करुन दाखवण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *