… माझी वाचक मनीषा हिने तिचा किस्सा काल फोनवर शेअर केला आणि मला म्हणाली ,मॅम यावर लिहाल का प्लीज..
मनीषा ही विदर्भातील एका गावात जन्मली. परिस्थिती गरीबीची आणि घरी सगळे शेतात राबुन आणि गरीबीनेही रापलेले होते .. तिने १२ वी पर्यंत शिक्षण घेतले .. पण शाळा कॉलेज मधे तिला काळी म्हणुन चिडवु लागले त्याचदरम्याने तिला एका व्याधीने ग्रासले आणि तिचे वजनही वाढले.. जमेल तसे तिला औषधोपचार केले गेले पण तिचं वजन कमी होइना ..
शेजारी , नातेवाईक कुजबुजु लागले हिला स्थळ कसे येणार .. हिचं काय होणार या सगळ्याने तिच्या मानसिकतेवर परिणाम होवु लागला.. तिने आरशात पाहिले की तिला तिचीच किळस वाटु लागली .. यावर काय करावे कळेना मग क्रीमच्या जाहिराती पाहुन तिने क्रीम वापरायला सुरुवात केली त्याने चेहऱ्यावर पिंपल्स आले आणि चेहरा अजुन खराब झाला .. अनेकदा आत्महत्या करण्याचे विचार मनात आले ..
पुढे तिचे जवळच्या गावात लग्न झाले .. ना रंगात फरक पडला ,,ना जाडीत फरक पडला ..तिचा नवरा ज्याने तिला स्विकारले तो उत्तम माणुस आहे आणि त्यांचा उत्तम संसार सुरु आहे.. पण ज्यानी तिला दुखावले , चिडवले त्यांच्यामुळे ती मानसिक रुग्ण झाली , त्यांच्यामुळे ती आत्महत्या करणार होती.. रंग , रुप , म्हणजेच बाह्य सौंदर्य याला आपण कोणीच कोणाला कमी लेखु नये ,हिणवु नये ,जर का तिने स्वतःला संपवले असते तर नकळत सगळ्याचे पाप चिडवणाऱ्याला भोगावे लागले असते..
सोशल मीडीयावर अनेकदा बॉडी शेमींगवरुन ट्रोल केले जाते.. कौतुक करता आले तर जरुर करावे नाहीतर व्यक्त होवु नका.. विश्वसुंदरी असो किवा अजुन कोणी निसर्गापुढे आपण शुल्लक आहोत..जसे मेंटेन करणे आपल्या हातात आहे तसेच समोरच्याला नावं ठेवायची नाहीत हेही आपल्याच हातात आहे…
प्रत्येक पाऊल उचलताना, प्रत्येक शब्द उच्चारताना ते उलटुन आपल्याकडे येणार आहे याचं भान असायलाच हवे ना..
हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे..
सोनल गोडबोले
लेखिका . अभिनेत्री