Yu made my evening.

अनेकांना वाटतं मी त्यांना भेटावं पण कधी कधी काही जणाना मला भेटायला आवडतं… वैचारिक देवाणघेवाण करणाऱ्या लोकांशी माझं जरा जास्त जमतं आणि काही जणांशी १० मीनीटात भेट संपते कारण त्यांच्याकडे अशी कुठलीही क्वालीटी नसते ज्याने आपण त्यांच्यात रमु शकतो..
कालची संध्याकाळ , पावसाची भुरभुर , अतिशय रोमॅन्टिक वातावरण आणि माझ्या मित्राचा आलेला मेसेज .. त्याला म्हटलं आपण भेटु पण पुण्यात ट्रॅफिक त्यामुळे कुठल्याही रोडला गेलो तरीही नकोसं होतं.. पण त्यातही किशोरची गाणी असतील किवा आपल्या आयुष्यात घडलेल्य काही घटना असतील ज्या आपण मित्रासोबत शेअर करतो मग ते ट्रॅफीकही धुक्यासारखं विरुन जातं..
कुठेतरी A.c मधे बसण्यापेक्षा किवा घरात बसण्यापेक्षा निसर्गात किवा बाहेर मोकळ्या हवेत बसण्याची मजा काही वेगळीच असते.. हातात कॉफीचा मग किवा उन्हाळ्यात आईस्क्रीम कप आणि बहारदार रंगलेले किस्से आणि हलकिशी पावसाची भुरभुर सोबत मित्रासोबत वेगवेगळ्या विषयावर मारलेल्ल्या गप्पा खरच अशी संध्याकाळ प्रत्येकाला आवडेल.. आणि मी अशा संध्याकाळचा अनेकदा आस्वाद घेतला आहे.. कालची संध्याकाळ अशीच होती एकदम रमणीय , आल्हाददायक , प्रफुल्लित आणि खरी मैत्री ज्यात कुठेही नव्हता स्वार्थ , होती फक्त आणि फक्त निखळ मैत्री..
आभार त्या पाऊस मित्राचे कारण अनेकदा त्याने मला आनंदात भिजवले आहे आणि आभार माझ्या मित्रांचे ज्यानी मला अनेकदा स्त्री म्हणुन नाही तर माणूस म्हणुन ट्रीट केले आहे.. Milind रात्री तुझा मेसेज आला yu made my evening पण हे मीही म्हणु शकते.. Yu made my evening..माझ्या सगळ्या मित्रांना देवाने असेच सुखी ठेवावे..

 

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *