Hug / आलिंगन / मिठी..
माझ्या वाचक सखीने व्यक्त केलेली मिठीतील मिठास..
सोनल मॅम , तुमच्या बियॉन्ड सेक्स कादंबरीतील मीरा सागर जीवंत आहे ज्यांना मी आज भेटले हे तिचं पहिलं वाक्य होतं..
त्यानंतर ती भरभरून बोलु लागली..
मॅम ,बऱ्याचदा बऱ्याच पुरुषांच्या मिठीत वासना जाणवते पण आज मी जे अनुभवलं ते बियॉन्ड होतं..त्याला मिठी मारावी ही माझीच इच्छा होती.. कदाचित ती त्याचीही होती असेल पण त्याला ते व्यक्त होता आलं नसावं कारण स्पर्श हा प्रत्येकाला हवा असतो .. ती आपल्या शरीराची आणि मनाची गरज असते…
तिनेच पुढाकार घेउन त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या मिठीत सुंदर २५ शीतील शिल्प असल्याचा त्याला भास झाला.. ४५ शीतील सुंदर ती त्याला विश्वसुंदरी वाटली .. आणि तिला त्याच्यात पावित्र्य दिसलं .. तिला त्याच्या स्पर्शात २४ कॅरट गोल्ड जाणवलं.. एका पुरुषाचा स्पर्श इतका रेशमी असतो हे तिने खुप कमी वेळा अनुभवलं होतं.. तिला त्याला मिठीतुन बाजूला होवु द्यायचं नव्हतं पण पुढच्या भेटीची हुरहुर तिला अनुभवायची होती.. तिला ती मिठाई चवीने खायची होती.
खरं तर तो तिच्या अंगावरुन हात फिरवु शकला असता , तो तिला किस करु शकला असता पण यात तो कुठे कमी नसुन त्याच्यावर असलेले संस्कार दिसले . त्याला तिला गमवायचं नव्हतं.. ती त्याच्यासाठी शरीर नव्हती तर पवित्र आत्मा होती.. नातं असावं तर असं , मैत्री असावी तर अशी राधा कृष्णा सारखी किवा कलियुगातील सागर मिरा सारखी..
आपण आपल्या पार्टनर सोबत करत असेलेल्या सेक्सपेक्षा मैत्रीणीसोबत करत असलेला रोमांस हा उच्चतम असतो.. माणसाने रोमॅन्टिक असावं पण वासनाधीन नसावं.. त्याने तिला जपावं आणि तिने ?? .. फक्त प्रेमाने जिंकावं.. प्रेमाइतकं या जगात काहीच पवित्र नाही.. जे शरीरापलिकडे असतं आणि त्याची व्याप्ती ही असीम असते..
तिच्या भावना मी माझ्या शब्दात मांडल्या आहेत कारण त्या तितक्याच खऱ्या आहेत..
सोनल गोडबोले
लेखिका , अभिनेत्री