जुन महिना आला , वातावरणात बदल दिसु लागला , पाऊस लवकरच येणार हेही जाणवायला लागलं.. की तीचे रील्स चे प्लॅन सुरु व्हायचे.. फोटोशुटसाठी कपडे खरेदी सुरु व्हायचे… खरच ती वेडी होती.. ती कशातही रमायची ना..
रखरखीत उन्हात ती बहावा ,गुलमोहर , निलमोहर यासाठी वेडी व्हायची .. हिवाळ्यात हुर्डा पार्टीचे प्लॅन सुरु व्हायचे ताह्मीनी घाट असो की वरंध घाट असो ती निसर्गासाठी कायमच वेडी होती..
आणि तो ??
त्याला फक्त ती आणि तिची गुलाबी छत्री आठवते.. लाल रंगाची साडी , त्यावर स्लीव्हलेस मॅचींग ब्लाउज स्लीम फिगर आणि तिच्या अदा.. मोकळ्या केसात वाऱ्यावर उडणाऱ्या बटा आणि साडी सावरताना पदराशी रेंगाळणारा खट्याळ वारा त्याला सगळं सगळं आठवतं. .. शेवरीच्या कापसाशी खेळताना तिचा दिसणारा कमनीय बांधा आणि पाण्याशी हितगुज करताना ती ,तिला काजवेही आवडायचे आणि रातराणीचा सुगंधही आवडायचा . जाळीवर काळीभोर करवंदं काढायला ती वाकली की तिचा पदर त्या काट्यालाही सोडवु वाटायचा नाही
.. तो पदर बाजुला करायला गेला की लक्ष जायचं ते भरलेल्या उरोजाकडे आणि मग ४२ डीग्रीतही तापमान ५० शी गाठायचं.. तो विदर्भातला त्यामुळे त्याला तापमानाने कधीच फरक पडला नाही पण ती मात्र हवालदिल होवुन पावसाची वाट पहायची..
धरणी पावसाला कवेत घ्यायला आसुसलेली असायची आणि तो तिला छत्रीत घ्यायला.. कॉलेज मधे असताना ती छ्त्रीच दोघांच्या प्रेमाची साक्षीदार होती आणि आजही तो तिची आणि पावसाची वाट पहातो पण फक्त आठवणीत कारण ती त्याला आणि या सुंदर जगाला कधीच सोडुन गेली होती..
सोनल गोडबोले
लेखिका ,अभिनेत्री