जी माणसं आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने आपल्या जीवनाच्या आलेखाचे अनेक क्षितिज पार करत यशस्वी जीवनाची यशोगाथा इतरांच्या जीवनाला आशादायी ठरणाऱ्या बाबी घडवून दाखवतात तीच माणसं समाजाला प्रेरक आणि प्रेरणादायी ठरत असतात.जापलेपणा, स्नेहभाव आणि अतिव स्नेहबंधाच्या भाव रेषा अधिक प्रगल्भ करत इतरांच्या जीवनाची सकारात्मकता आणि सजगतेच्या पाऊलखुणा मोजतात ती व्यक्तिमत्व इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असतात…..
ज्यांचे जीवनच मुळी दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करण्यासाठी होतो.दुसऱ्याच्या अडीअडचणी स्वतःच्या समजून रात्रंदिवस समाजाच्या उत्थानाचा उद्धाराचा, परिवर्तनाचा आणि प्रबोधनाचा जागर उभा करतात अशी माणसं नेहमीच समाजाला दिशादर्शक ठरत असतात. अशी आपलेपणाच्या भावनेचा विचार करणारे माणसे समाजात तुरळ दिसत असताना सोनू दरेगावकर नावाचा एक युवा साहित्यिक समाजाच्या उत्थानाचा विचार करणारा एक समाजहितेशी दुसन्यांच्या सुखदुःखात चावून जाणारा एक आपलेपणाचा सहयोगी सोनू दरेगावकर या कर्तृत्ववान लेकराचा आज वाढदिवस..
वाढदिवसाच्या निमित्ताने सोनू दरेगावकर या कार्यकर्तृत्वाला आणि स्नेहबंधाच्या भावबंधात रममान होणाऱ्या आपलेपणाच्या आपल्या माणसाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि शुभकामना…
सोनू दरेगावकर हे तसे नात्याने आणि शिव शेजारी म्हणून आम्ही जवळचे आहोत. परंतु रक्ताच्या नात्यापेक्षाही चळवळीतील नाते अधिक प्रेरक ठरतात. आणि दिशादर्शक असतात. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटल्या जाते. सोनू दरेगावकर लहानपणापासूनच सामाजिक भान जपणारा, सामान्य उपेक्षित, वंचित माणूस विकासाच्या प्रवाहात यावा, तो सुखाने जगावा, त्याच्या जीवनात आनंदाचे काही क्षण यावेत आणि आपलं जीवन ते दुसऱ्याचे जीवन समजून आपलं जीवन उज्वल करत दुसऱ्याच्या जीवनाची उज्वलता आपल्यात पाहणारा एक समाजहितेशी म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण करतो आहे. ही अत्यंत अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे..
समाज कल्याण विभागातील जात पडताळणी कार्यालयात कार्यरत असलेले सोनू दरेगावकर हे खेडेगावातील वाडी तांड्यावरील गरीब माणसं जेव्हा जात पडताळणी कार्यालयात आपल्या लेकरांच्या प्रमाणपत्रासाठी कधी घामाने ओली चिंब झालेली तर कधी तहाने आणि भुकेने व्याकुळ झालेली माणस रांगेत उभी टाकतात आणि त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर सोनू दरेगावकर अस्वस्थ होतात आणि खुर्चीवरून उठून आपल्या जवळची पाण्याची बाटली त्या माणसाच्या हातात देऊन पंख्याला आत येऊन बसा ही आपलेपणाची जाणीव सोनू दरेगावकर नावाच्या व्यक्तिमत्त्वाच्या कृतीतून दिसून येते. माणुसकीची आणि माणूसपणाची रीत जपणारी एक नवी परंपरा जपताना सोनू दरेगावकर यांच्या रूपाने मी अनेकदा पाहिलो आहे.एरवी खेडेगावातील वाडी तांड्यावरील उपेक्षित, वंचित घटकातील माणसं जेव्हा शासकीय कार्यालयात येतात तेव्हा अगदी हताश निराश होऊन समोरच्या अधिकाऱ्याकडे याचनेच्या स्वरूपात उभी टाकलेले असतात भुकेने तहाने व्याकुळ झालेली ही माणसं समोर उभी टाकल्यानंतरही आमच्या शासकीय कार्यालयातील दगडाचा आत्मा असलेल्या अनेक अधिकाऱ्यांना त्या सामान्य माणसाच्या जगण्याची त्याच्या वागण्याची कीव येत नाही. ही अत्यंत दुर्दैवी घटना आपण अनेकदा शासकीय कार्यालयात पाहतो परंतु सोनू दरेगावकर सारखा एक कार्यकर्ता कर्मचारी दुस-याच्या कल्याणाचा विचार करत दुसन्याचं सुख ते आपलं सुख मानून दुसऱ्याच्या जीवनात आनंद जागविण्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा सगळीकडेच वाळवंट पसरले असं वाटत असताना ओसाड आणि उजाड माळरानावर काही हिरवळीचे बेट फुलताना दिसतात तसे सोनू दरेगावकर यांच्याकडे पाहिल्यानंतर अनुभवायला येते….
कर्तृत्वाने आणि पैशाने मोठी झालेली माणसं गावाकडची माती, माय आणि माणसं पार विसरून चालले असताना काही माणसं मात्र आपल्या गावावर गावातील माणसांवर आणि आपल्या आई-वडिलांवर जीवापाड प्रेम करताना दिसतात. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. सोनू दरेगावकर यातला एक स्फूर्तीदायी आणि प्रेरक व्यक्तिमत्व म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. दरवर्षी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कधी गावातील वृद्ध आई मावशींसाठी साडी चोळीचे वाटप करतो तेही उच्च प्रतीची, तर कधी वृद्ध आजी,आजोबांसाठी मायेची आणि आधाराची काठी हातात देतो, कधी आरोग्य तपासणीच्या रूपाने त्यांच्या आरोग्याची सेवा करतो तर कधी अडल्यानडल्या आपल्या माणसांना आपल्या परीने मदत करतो. हे सोनू दरेगावकर यांचे
व्यक्तिमत्व निश्चितच आजच्या तरुणांसाठी प्रेरक आणि आशादायी चित्र निर्माण करणारे आहे…….
आई, बहिण, भाऊ आणि नातेवाईक हे तर आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असतात परंतु त्या पलीकडेही जाऊन काही नाती जीवनाला नवी उभारी देणारे असतात. हे सोनू दरेगावकर यांनी आपल्या कर्मयोगातून आणि कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. दरेगाव तालुका नायगाव या छोट्याशा गावात जन्मलेला हा कर्मयोगी वयाने आणि अनुभवाने लहान असला तरी कर्तृत्वाच्या उंच शिखरावर आपले उत्तुंग भरारी घेण्याचे त्यांचे स्वप्न हे मात्र शंभर वर्षाच्या आणि आयुष्यभर काहीच न करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे नितळ आणि निर्मळ व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्धीस येत आहे.अंतःकरण स्वच्छ, नितळ आणि निर्मळ असलं की त्यांच्या अंतःकरणातील अक्षर सुद्धा तितकेच सुकावह आणि प्रज्ञा आणि प्रतिभेच्या पटलावर अवीट तशी अक्षर निर्मिती घडवत असतात आणि त्यांच्या अक्षर निर्मितीने कधी कवितेचा तर कधी कथेचा तर कधी सजग आणि समृद्ध साहित्य जगण्याची अक्षरवेल आकाशाकडे झेप घेताना अनुभवास येते. सोनू सोनू दरेगावकर या युवा साहित्यिकांचा आता नव्याने येणारा कवितासंग्रह महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळात चर्चा घडवून आणणारा आहे…
सोनू दरेगावकर या ध्येयवेढ्या,दुसन्याच्या कल्याणासाठी, दुसऱ्याच्या सुखासाठी, समृद्धीसाठी आणि त्याच्या समाधानासाठी आपलं जीवन व्यतीत करणाऱ्या या ध्येयवेड्या कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप आभाळभर शुभेच्छा आणि
शुभकामना………
*** *शुभेच्छुक***
••• *शिवा कांबळे* •••
*(राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक, नांदेड)*
संपर्क : 9422872721