नाती आणि देवाणघेवाण..

 

माझी मुलगी आणि मी घट्ट मैत्रीणी.. ती अतिशय हुशार ,,सुंदर , प्रगल्भ विचार .MIT univercity मधे टॉपर गोल्ड मेडलीस्ट. ती बॉलीवूडमधे आर्टडिरेक्टर आहे.. प्रचंड वाचन आहे.. ती सध्या भगवदगीता वाचतेय आणि मीही समजुन घ्यायचा प्रयत्न करतेय..आज सहा महिन्याने दोघी भेटलो.. मम्मा म्हणत तिचं माझ्या गळ्यात पडणं असेल , लगेच स्वतःला सावरणं असेल ,
बॉलीवूडमधले तिचे अनुभव माझ्याशी शेअर करणं असेल .. मी कुठल्या पुस्तकावर सध्या काम करतेय हे जाणुन घेणं असेल या सगळ्याची देवाणघेवाण झाली.. सहा महिन्याने पाहिल्यावर आज माझं बाळ जास्त मच्युअर जाणवलं.. बॉलीवूडमधल्या लोकांवर भरभरुन बोलताना तिच्यात वेगळाच आत्मविश्वास दिसत होता.. तिला गमतीने म्हटलं, तुझं नाव मॅट्रीमोनीमधे दिलय त्यावर तिचं mamma chill मार म्हणणं असेल पण वैचारिक लेव्हल ला जेव्हा ती बोलते तेव्हा मात्र मी हरते आणि माझी हार मान्य करते…

 

लहानपणापणी तिला लावलेली वाचनाची आवड ही मला हार मानायला भाग पाडते.. मुलानी कायम आपल्या पुढेच असावं.. नात्यात देवाणघेवाण हवी मग कितीही महिन्याने तुम्ही भेटा ती नाती तितकीच टवटवीत दिसतात…
पालक आणि मुलं यांच्यात लैंगिकतेपासुन सगळ्या विषयावर चर्चा जेव्हा होते तेव्हा त्या नात्यात कमतरता रहात नाही.. मुलं पालकांचं अनुकरण करतात , सचिन तिला म्हणाला , काय मग सिगरेट ट्राय केलीस की नाही ??.. ती म्हणाली ,,पप्पा I hate such थिंग्स .. आपल्या घरात कोणी व्यसनं करतं का मग मी का करु ?? .. पण एक मात्र बोलली , लव्ह मॅरेज करणार.. मी म्हटलं चला , सुटले बाबा , मॅट्रीमोनीत जायला नको.. आपण करत असलेल्या प्रत्येक हालचालीवर आपल्या पाल्याचं आयुष्य घडत असतं म्हणुन घरात नवरा बायकोत सुसंवाद हवा. एकमेकांबद्दल आदर हवा.. विभक्त कुटुंब पध्दतीत नात्याना वेळ देता यायला हवा..घर निर्व्यसनी हवं..
व्यायामाची आवड हवी..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *