सोनु दरेगावकर याचा मला लहानपणापासूनच परिचय आहे. याचे कारण तो माझ्या गावचा म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील दरेगाव येथील असून त्याचा जन्म एका आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य कुटुंबात दिनांक 12 जून 1991 रोजी झाला. त्याचे वडील बबनराव व आई अंबुबाई ह्या निरक्षर असूनही आपल्या मुलाला शिकविले. सोनुने अत्यंत काटकसर करून बी.ए.पदवी व डी.एड आणि एम. ए पदविका प्राप्त केली. तो नांदेडच्या जात पडताळणी कार्यालयात सेवा करत आहे. ही सेवा करत असताना समाजातील गोरगरीब माणसाला तो आवर्जून मदत करण्याची त्याची वृत्ती दिसून येते.
सोनूचे वडिल बाबनराव दरेगावकर यांनी दरेगाव नगरीचे सरपंच पद भूषविले.
सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागणारा सरपंच म्हणून त्यांच्या
विषयी माझ्या मनात आदर आहे.
त्याची धडपड मी लहानपणापासून पाहतो. त्याच्या गुणाची खरी ओळख मला दरेगावामध्ये गेल्या चोवीस वर्षापासून ज्ञानदीपाची दीपावली व इतर सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवत असताना झाली. सोनु हा त्याच्या हायस्कूलला असल्यापासून या कार्यक्रमात भाषण करत आला आहे. तेव्हाच त्याच्या अंगी असणार्या परिवर्तनवादी विचाराचाही परिचय झाला. ज्ञानदीपाची दीपावली या कार्यक्रमात मला लहानपणापासून सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे त्याचा उपयोग झाल्याचे तो सांगत असतो. अनेकदा या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करत असतो.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत असतो.
तसेच आज स्वत:ही वेगवेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवत आहे याचे मला विशेष कौतुक वाटते.
अचानक त्याच्या वडिलांचे 19 फेब्रुवारी 2020 रोजी. निधन झाले.
आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी गेल्या तीन वर्षांपासून सोनू दरेगावकर यांनी प्रबोधनात्मक कार्यक्रम दरेगावात नगरीत घेतले.
त्यांने गावातील विधवांना साडी-चौळी आणि ग्रंथ देऊन सत्कार केला. वृध्दांना काठी वाटप करून आधार देण्यासाठी प्रयत्न केला.
त्यांच्यामुळे दरेगाव नगरीत येऊ शकले. आंबेडकरी विचार मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष नारायणराव बागडे साहेब हे त्याच्या प्रयत्नामुळे दरेगावला दोन वेळेस साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीला निमित्ताने आले. त्यांच्या मौलिक मार्गदर्शनाचा लाभ गावकर्यांना झाला.
सोनूच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला
महाराष्ट्र शासनाचे पूर्व शिक्षण संचालक तथा लक्ष्यवेध
फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ.
गोविंद नांदेड साहेब,
राष्ट्रपती पुरस्कार पारितोषिक प्राप्त शिक्षक,
साहित्यिक , वक्ते तथा लक्ष्यवेधचे फाउंडेशनचे कार्यकारणी सदस्य शिवा कांबळे
माननीय गिरी आणि त्यांची पत्नी गुंजन गिरी
येऊन गेले
वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाची सोनूला आवड आहे. त्यामुळे तो वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातही सहभागी होत असतो. लक्षवेध फाउंडेशनच्या कार्यक्रमातही त्यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले आहे.
सर्वांसोबत समन्वयाने राहण्याची त्याची वृत्ती निश्चितच कौतुकास्पद आहे. ग्रंथभेट ही एक अमौलिक अशी भेट असते. समाजात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ही बाब उपकारक ठरते. ही बाब लक्षात घेऊन तो वेगवेगळ्या कार्यक्रमात ग्रंथ भेट देत असतो. व तसेच महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करतो.
जर कोणावर अन्याय होत असेल तर तो अन्याय दूर करणे गरजेचे असते. त्यामुळे तो हे काम करायला देखील त्याला आवडते. त्याचे वक्तृत्वही चांगले आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमात तो आपले विचार मांडून समाजाला विधायक दिशा देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या जीवन कार्याचा परिचय करून देणारा उपक्रमशील हनुमंत भोपाळे हा ग्रंथ त्यांनी संपादित आणि प्रकाशित केला असून त्याचा सोनूच्या चोराळ्या हा
काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. लेखनी आणि वाणीतून तो नेहमी समाजाला पोषक विचारांची पेरणी करतो. त्याच्या मित्रमंडळीने त्याचा वाढदिवस दि.12 जून 2023 रोजी हॉटेल राजयोग नमस्कार चौक, नांदेड येथे प्रबोधन, शैक्षणिक साहित्याचे वाटप व वृक्षारोपण, ग्रंथदान करून साजरा करण्याचे ठरविले आहे. गेल्या वर्षी त्याचा झालेला वाढदिवस हा त्यांने संघटित केलेल्या माणसांचा जाळ किती मोठा आहे, याचा प्रत्यय आणून देणारा होता.
यावर्षीदेखील तो प्रत्यय येईलच.
या कार्यक्रमास व सोनुच्या वाढदिवसास माझ्या हार्दिक शुभेच्छा !
डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
संपर्क: मो.9767704604