आ.श्यामसुंदर शिंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा नांदेड येथील स्मेरा निवास्थानी होणार साजरा

लोहा / प्रतिनिधी
लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस 15 जून रोजी लोहा कंधार मतदार संघातील व नांदेड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे,आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हावा या संकल्पनेतून शेकापच्या कार्यकर्त्यानी आमदार शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर,रक्तदान शिबिर,अंनाथ मुलांना कपडे व खाऊ वाटप असे अनेक सामाजिक उपक्रमांनी आमदार शिंदे यांच्या नांदेड येथील स्मेरा निवासस्थानी गुरुवार दिनांक 15 जून रोजी सकाळी 10 वाजता वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा साजरा होणार आहे.

अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त ठेवलेल्या आरोग्य शिबीराचा लोहा कंधार मतदार संघातील जनतेनी व नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेनी लाभ घेऊन अभिष्टचिंतन सोहळ्याला सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थितीत राहावे असे आवहान,शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अवधूत पाटील शिंदे, बालाजी ईसादकर यांनी केले आहे.

———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *