उभ्या चाळी

मुंबईत जाता येताना दोन्ही बाजूला प्रगती दिसली म्हणजेच काय तर बैठ्या चाळी जाऊन उभ्या चाळी दिसायला लागल्या.. चाळीत रहातो सांगायला लाज वाटते म्हणुन सोफीस्टीकेटेड टॉवर शब्द आला.. पण चाळीतील प्रेम , माणुसकी मात्र दरवाज्यामागे बंद झाली.. एकत्र येउन सणवार साजरे करणारे , सुखदुख वाटणारे मोबाईलमधे कुढु लागले..
आणि स्क्वेअर फुटावर आणि एरीयावर श्रीमंती भासवु लागले..

ट्रॅव्हल करताना रात्री लाइटची चाललेली दिवाळी पाहीली आणि क्षणभर वाटलं ही लाईट कुठे तयार होत असेल , इतक्या चाळकऱ्याना पाणी कुठुन येत असेल… मोकळी हवा घेउन अनेक वर्षे झाली असतील.. सुर्यप्रकाश यायला टॉवर रुपी रावण आजूबाजूला उभे आहेतच .. डोंगर बिचारे केविलवाणे झाले आहेत त्याना पाहायला आता डोंगर आणि सुर्य ( चित्र ) काढावे लागणार.. त्यातच एखादे नारळाचे झाड आणि उडणारे चारपाच पक्षी हे लहानपणी काढलेले चित्र सत्यात उतरेल असं अजिबात वाटलं नव्हतं.. सगळीकडे प्लास्टीकचा ढिग आणि स्वच्छ मुंबई म्हणे.. हीच परिस्थिती काही वर्षात पुण्याची होणार आहे..

आम्हाला शिळ्या भाताला फोडणी देउन खायला आपलं डाएट आडवं येतं पण त्यालाच शेजवान चटणीचा तडका दिला की शेजवान राइस ही २०० रुपयाची डीश तयार होते आणि २० रुपयाची गोष्ट २०० ला विकत घेउन आम्ही किती श्रीमंत आहोत याचा आव आणतो..
लाईटच्या भगभगत्या आणि आभासी दुनीयेत आपण एक दिवस जळणार हे मात्र नक्की.. या सगळ्यात आपण प्रत्येकजण काय करु शकतो ?? .. कमीत कमी गरजा , थोडक्यात समाधान , उच्च विचारसरणी , घरचा आहार ,व्यायाम आणि आपल्या कामात व्यस्त रहाणं , पाणी लाईट जपुन वापरणे , जमेल तितकी दुसऱ्याला मदत ,चांगलं वागणं.. आणि भगवंताशी जास्तीत जास्त कनेक्ट व्हायचा प्रयत्न करणं..
रात्री २ वाजता रस्त्यावर वयात आलेली मुलं मुली सिगरेटओढणं , चहा पिणं हे पाहिलं आणि मन सुन्न झालं..मुलाच्या हातात हात घेउन रात्री रस्त्यावर हिंडणं असेल सगळच भयानक.. रोज वेळेत झोपुन सकाळी लवकर व्यायामासाठी उठणारी मी हे दृश्य पाहुन हादरलेच.. पालकानी आणि मुलानी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.. नाहीतर उभ्या चाळी आपल्याला आडवं करणार यात तिळमात्र शंका नाही..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *