कोण होणार करोडपती..( मराठी )..
अनेक रिॲलिटी शो असतात याआधी दोन रीॲलीटी शो मधे आम्हीही भाग घेतला होता पण गेल्या दोन वर्षापासून मी सचिन ला म्हणत होते , kbc ला ट्राय कर , हिन्दीमधे ४ राउंड पुढे गेला पण त्यापुढे जाता आलं नाही मग मराठीसाठी प्रयत्न केला यामागे कारण भरपुर पैसा मिळवणं हे नसुन ( अर्थात मिळाला तर तो हवा असतोच ) सचिन ने हॉटसीटवर जावं ही मनोमन इच्छा होती.
सचिन गोडबोले ( my hubby ) .. एका सॉफ्टवेअरकंपनीमधे मॅनेजर पदावर कार्यरत आहे.. तो चेस ( बुध्दीबळ ) International rated player आहे .. अनेक विध्यार्थी त्याने घडवले आहेत.. उत्तम लेखक आहे , आणि माझ्यासारख्या कधीही शांत न बसणाऱ्या स्त्रीला झेलणारा उत्तम माणूस , प्रियकर ,नवरा..अनेक बदमाश( प्रेमाने ) मैत्रीणींचा मित्रही आहे बरं का..
जसजसा एकएक राउंड पार करत पुढे जात होता तसतसा घरात अभ्यास सुरु होता.. काही अभ्यास माझ्या कर्णपटलावरुन जात होते.. नक्की अभ्यास काय करायचे कोणालाच माहीत नसतं आणि ते शक्यही नाही.. घरी बसुन उत्तर देणं सोपे आहे किवा किती सोप्पा होता प्रश्न का आलं नाही याचं उत्तर हे म्हणणं खूपच सोप्पं आहे पण जेव्हा fastest finger first साठी तिथे जाता त्यावेळी मात्र जे काही होतं ते फक्त त्या कंटेस्टटनाच माहीत.. सगळं खुप अवघड आहे इतकच मी सांगेन.. कारण मी त्याची साक्षीदार आहे.. mpsc , upsc तयारी करणाऱ्यानी यासाठी जरुर प्रयत्न करा. आणि ज्यांना kbc ला जायचय त्याना सांगेन गेम म्हणुन उतरा , स्पोर्टींगली घ्या ,, हॉटसीट वर जायला फक्त हुशारी नाही तर नशीबही लागतं जे अनेक लाखात खुप कमी जणांच्या नशीबात असतं.. पण प्रयत्न सोडु नका.. मी जशी सचिनच्या मागे प्रेमाचा हंटर घेउन उभी असते तसं तुम्हीही तुमच्या पार्टनर च्या मागे उभे रहा आणि आपल्या जीवनात नवनवीन रंग भरा..
सचिन हॉटसीटवर गेलाय.. तिथे गेल्यावर काय झालय ते एपीसोडमधे पहा..पुढच्या आठवड्यात बुधवारी २८ जुन ,रात्री ९ वाजता , सोनी मराठीवर..
रोज नवनवीन चॅलेंजेस स्वीकारा ,वाचत रहा ,,अभ्यास करत रहा..
सोनल गोडबोले