यालाच व्यास पौर्णिमा म्हणतात.. महाभारत , भगवदगीता किवा सगळे आध्यात्मिक ग्रंथ ज्यानी लिहीले ते म्हणजे कृष्णद्वैपायन वेदव्यास .. अनेक वेदांचा व्यास म्हणजेच विस्तृती ज्यानी केली तेच आपले गुरु आहेत..
आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर आपल्याला गुरु भेटतो पण तो गुरु तितका अभ्यासु असेल तरच आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळु शकतं नाहीतर चुकीच्या पध्दतीने आपल्याला माहीती मिळुन त्यावर आपण चुकीच्या पद्धतीने विचार करतो आणि चुकीच्या गोष्टी आचरणात आणतो.. अनेक सिनेमातुन अनेक चुकीच्या गोष्टी दाखवल्या जातात त्यामुळे पुढची पिढी त्याचेच अनुकरण करते.. म्हणुन आपल्या मुलांना लहानपणीच रामरक्षा ,स्तोत्र किवा आध्यात्मिक माहीती दिली पाहिजे..
आपल्या आयुष्यात गुरुचं स्थान उच्च आहे.. माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षणी अनेक गुरु भेटले .. माझे वाचक ,चाहते हे सुध्दा माझे गुरुच आहेत.. गेली सहा महिने मी Indigenous Nutrition चा सर्टीफिकेट कोर्स करत होते आज त्याचा रिझल्ट होता.. त्याही कोर्स मधे ज्या शिक्षीका होत्या त्यांच्याकडुन मी अनेक गोष्टी शिकले..
आज प्रत्येक गुरुची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस पण आपण रोजच प्रत्येकाची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे कारण सगळ्यात जास्त ताकद कृतज्ञतेत आहे..
सोनल गोडबोले