कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मार्फत सर्व शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा ..! भरण्यासाठी विठ्ठल भानुदास गीते
तालुका कृषी अधिकारी कंधार यांच्या वतीने आवाहन करण्यात आले .
शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा सर्व समावेशक पंतप्रधान पिक विमा योजना लागू झाली आहे .
यामध्ये सोयाबीन, कापुस, तुर, , मुग, उडीद व ज्वारी या सहा पिकांचा समावेश आहे .
31 जुलै पर्यंत शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा उतरून भाग घेता येतो . नांदेड जिल्ह्यासाठी युनायटेड इन्शुरन्स विमा कंपनी नेमण्यात आली आहे शेतकऱ्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता विमा भरून घेण्याचे आवाहन विठ्ठल भानुदास गीते तालुका कृषी अधिकारी कार्यालय कंधार यांच्यामार्फत मा. जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे .
खरीप 2023 साठी लागू झालेली ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे . वयक्तीक खातेदार व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकऱ्यांना ही या योजनेत सहभागी होता येते .
खरीप हंगामात ज्वारी तुर, मुग, उडीद, कापूस, सोयाबीन , या पिकासाठी शेतकऱ्यांना विमा भरता येईल आपले सरकार सेवा केंद्र / सीएससी / बँक / प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था तसेच ऑनलाईन पद्धतीने विमा भरता येईल यात सहभागी शेतकऱ्यांना सातबारा आधार कार्ड बँक पासबुकची प्रत पिकाची पेरणी बाबतची स्वयंघोषणापत्र लागेल तसेच प्रती विमा पॉलीसी करीता फक्त एक १ रुपया लागेल .
शासनाकडून csc केंद्र चालक यांना प्रति पिकविमा पॉलीसी रू ४० प्रमाणे पैसे दिले जातात . या व्यतिरीक्त csc / सेतू सुविधा केंद्र चालक यांनी शेतकरी यांचेकडून अधिकची रक्कम घेवू नये अशी माहिती तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गित्ते यांनी दिली .