सध्याचा हवामान अंदाज घेता आपल्या तालुक्यात काही महसूल मंडळामध्ये आणखीनही पेरणी योग्य पाऊस झाला नाही . सलग ३ते ५ दिवसामध्ये 75 ते 100 मिली पाऊस झाल्यानंतर जमीनितील ओल पाहून पेरणी करावी . सद्या स्थिती मध्ये पेरणी करण्याकरिता बीबीएफ तसेच रुंद सरीवरंबा पद्धत उतारास आडवी पेरणी करावी जेणेकरून मुलस्थानी जलसंधारण होण्यास मदत होईल . पेरणी पूर्वी बिज प्रक्रिया करूनच पेरणी करावी .
बिजप्रक्रिया करताना सर्वप्रथम जैवीक त्यानंतर बुरशीनाशक व किटकनाशकाची बिज प्रक्रिया करावी . सध्या स्थिती मध्ये जास्तीत जास्त आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून जोखीम कमी करता येईल; असे अवाहन तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गित्ते यांनी केले आहे .
तसेच सध्याच्या हवामान अंदाज घेता तसेच 1जुलै ते 7 जुलै परणी करण्यासाठी खरीपातील सर्व पिके ( तुर मुग उडीद संकरीत ज्वारी बाजरी कापूस सोयाबीन तीळ भूईमुग ई ) घेता येतात .
पाऊस 8 जुलै ते 15 जुलै पर्यंत पडला तर कापूस संकरित ज्वारी संकरित बाजरी सोयाबीन तूर सूर्यफूल ही पिके घेता येतील; मूग, उडीद व भुईमूग ही पिके शेतकऱ्यांनी घ्यावयाची टाळावे .
31 जुलै पर्यंत कापूस, भुईमूग संकरित ज्वारी घेण्याचे टाळावे तसेच 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान कापूस भुईमूग संकरित ज्वारी टाळावी 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान कापूस भुईमूग संकरित ज्वारी तीळ घेण्याचे टाळावे असे आवाहन कंधार तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गिते यांनी केले आहे .