काय असेल त्याच्या मनात ??

बऱ्याचदा सचिन पण म्हणतो आणि माझे मित्रही म्हणतात , सोनल तु मनकवडी आहेस.. मला वाटतं आपण सेंसेटीव्ह असलो ना की समोरच्याच्या मनात आणि हृदयात काय सुरु असेल याचा अंदाज लावु शकतो.. आमच्या सोसायटीमधे एक चहाची टपरी आहे आणि त्याच्या शेजारी दुध डेअरी आहे.. काल दुध आणायला जात असताना मनात विचार आला रवी दादा ( माझे वाचक मित्र ) जे त्या टपरीवर चहा पीत स्मोक करत बसायचे .खुप दिवसांत भेटले नाहीत आज भेटतात का पाहु ?? असं म्हणत तिथे गेल्यावर समजलं की ते दोन महीन्यापूर्वी देवाघरी गेले.. मन खिन्न झालं कारण माझ्या झुल्यावर कॉफी प्यायची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली.. मधे एकदा त्यांना उदास पाहिलं होतं त्यावेळी मनात विचार आला , नक्की काय असेल दादांच्या मनात ??
काल फ्रेंड्ससोबत कॉफी कट्ट्यावर बसले होते.. सोबत ड्ब्यातुन पालक पुऱ्या घेउन गेले होते.. गप्पा मारता मारता काहीतरी माझ्या हातचं माझ्या फ्रेंड्सना खाऊ घालता येइल पण तितक्यात एक पांढराशुभ्र भुभु तिथे आला.. प्राणी , पक्षी पाहिले की मी माझी रहातच नाही.. तो चिखलात लोळुन आला होता तरीही त्याला जवळ घ्यायचा मोह आवरला नाही..त्याचीही एक पुरी खाऊन झाली.. त्यालाही आवडली हे त्याच्या शेपटी हलवण्यावरुन समजलं..पुन्हां एक दिली.. अजुन एक .. आणि तितक्यात मित्र म्हणाला , त्याचे डोळे भरुन आले बघ सोनल.. त्याच्या जवळ जाऊन बसले आणि म्हटलं , कारे , तुझ्या डोळ्यात पाणी का आलं ??.. त्यावेळी मला वाटलं , मी Animal communicator चा कोर्स करायला हवा होता.. आता या क्षणी त्याला काय वाटतय हे मी ओळखु शकले असते.. त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत त्याच्याशी बोलत राहीले , त्याला म्हटलं ,हा खाऊ बाप्पाने दिलाय मी आणलेला नाही..आज कदाचित तु उपाशी असशील म्हणुन त्याने मला पुऱ्या घेउन पाठवलं असेल.. मी निमित्तमात्र होते.. भगवंताला प्रत्येकाची काळजी करावी लागते ना हे त्यावेळी प्रकर्षाने जाणवलं.. त्याच्या डोळ्यातील पाणी हे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असावं का ??.. कारण भुकेच्या वेळी त्याला खायला मिळालं होतं.. नक्की काय असेल त्यांच्या मनात ??.. जग किती सुंदर आहे हे पदोपदी जाणवतं आणि अशा कलियुगात मला देवाने सेंसेटीव्ह बनवलय याबद्दल त्याची कृतज्ञता व्यक्त करते कारण माणुस विचारी असेल सेंसेबल असेल सेंसेटीव्ह असेल तरच तो दुसऱ्याच्या मनात उतरु शकतो.. आपण प्रत्येकाला मदत करु शकत नाही पण जास्तीत जास्त चांगलं वागण्याचा प्रयत्न नक्की करु शकतो..


सोनल गोडबोले
लेखिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *