राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सच्च्या कार्यकर्त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजचा हा लेख आद. पवार साहेब व आपल्या सर्वांच्या निष्ठेला सन्मानपूर्वक अर्पण करतो.
मी मागील बऱ्याच लेखात आद. साहेब हे राज्यातील कोणकोणत्या कुटुंबासाठी खऱ्या अर्थाने भाग्यविधाते किंवा माझ्या भाषेत ” राजकीय परिस ” ठरले आहे, हे मी मागील चार वर्षांपासून सतत राज्यापुढे मांडत आलो आहे. पण आज परिस्थिती जरा वेगळी आहे. त्यासाठी आज मी अतिशय सभ्य भाषेत भुजबळ साहेब, दिलीप वळसे साहेब, धनंजय मुंडे साहेब, आणि प्रफुल पटेल व रुपालीताई चाकणकर यांच्या विषयी मागील 32 वर्षाचा स्वच्छ इतिहास मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
मित्रांनो, मागील आठवड्यात राज्यात विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्या हालचाली झाल्या त्यामुळे सामान्य माणूस, मतदार हा विदविग्न झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठी आपण भुजबळ साहेबांच्या पासून सुरुवात करूया. शिवसेनेचे तत्कालीन नेते छगन भुजबळ हे 1993 ला शिवसेनेत उबगलेले नेते होते. ही गोष्ट आद पवार साहेबांनी ओळखली होती. त्यावेळी भुजबळ हे काँग्रेस पक्षात काही 17/ 18 आमदारांना घेऊन प्रवेशकर्ते झाले होते . 1993 साली भुजबलांनी आपणच राज्यातील माळी समाजाचे नेते असल्याचे भासवत आद. पवार साहेबांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील जालना येथे समता परिषदेची स्थापना केली. त्यावेळी भुजबलांनी असा आव आणला होता कि, जणूकाही आपणच पवार साहेबांच्याकडे आल्यामुळे पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी राज्यात मंडल आयोग लागू केला. वास्तविक भुजबळ काँग्रेस पक्षात येण्यापूर्वीच आद. पवार साहेबांनी मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी राज्यात लागू केल्या होत्या. या सर्व गोष्टीचा मी जालनाकर या नात्याने साक्षीदार आहे.
भुजबळ हे 1993 ला ज्या वेळेस काँग्रेस पक्षात आले, त्यावेळीपासून आद. पवार साहेबांनी भुजबळांना लाल दिवा दिला, तो दिवा 2014 ला सत्तानतर झाल्यावरच गेला. म्हणजे 21 वर्षे. या मधल्या काळात काय केले न काय नाही, भुजबळ हे अडीच वर्ष जेलात गेले. पुढे ते जेलमाधून बाहेर आल्यावर आद, साहेबांनी त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये सन्मानपूर्वक पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद दिले.
आता आपण मुख्य मुद्यावर येऊ. भुजबळ साहेब ज्या माळी समाजातून येतात, त्याच समाजातील मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. म्हणून आग्रहपूर्वक विचारतो कि, साहेब, आद. पवार साहेबांनी आपल्याला अजून काय द्यायला पाहिजे होते ? आपल्या मुलाला आमदार केले, पुतण्याला खासदार केले. म्हणून तुम्ही भाजपच्या सोबतीला गेलात का ? साहेब, आपण समाजासाठी आणि ओ बी सी समाजासाठी काय केले ? उलट सत्तेच्या कालखंडात नको असलेली कामे केली, आणि अडीच वर्षे जेल भोगली.आणि हो, ओ बी सी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्याचे पुण्यकर्म आद, पवार साहेबांनीच केलं होतं हे सर्वश्रुत आहे.
भुजबळ साहेब, आपण आज भाजप सोबत गेल्यानंतर पवारांच्यावर बेछूटपणे आरोप करतांना आद, पवार साहेबांचे आपल्या कुटुंबाप्रति असलेल्या सदभावनेचे पुनरावलोकन आपण केले पाहिजे. नसता आपण आद, पवार साहेबांच्या करायची परतफेड करणे सुरु केले कि काय ? असे राज्यातील जनता म्हणायला सुरुवात करेल, यापेक्षा अजून काय बोलू साहेब, बाकी आपण सुज्ञ आहात,
प्रिय वाचक मित्रांनो, उद्याच्या लेखात वरीलपैकी दुसऱ्या एका नेत्याबद्दल अशाच भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे, माझी ही आठ दिवसाची लेख मालिका आपण संपूर्ण राज्यात शेअर करावी. ही आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो.
जय राष्ट्रवादी
बंडू जावळे जालना
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
9860987698