निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्हीटीच पसरवते ..जास्त ऐकावं… कमी बोलावं

जास्त ऐकावं… कमी बोलावं
हे ज्याला जमतं तो बरच काही साध्य करु शकतो.. जिथे गरज नाही तिथे व्यक्त होवु नये हेच योग्य..
आताच यूट्यूबवर बीके शिवानी यांना ऐकत होते.. त्या खूपच सुंदर बोलतात .. वेळ मिळेल तसं मी अनेकांना ऐकते..
सरश्री ना ऐकते.. ओशोना ऐकते.. भगवदगीतेवर खुप जण खुप छान बोलतात.. किवा पुस्तक वाचन सतत सुरु असतं.. मला माझा वेळ वाया गेलेला आवडत नाही.. दंगा करताना फक्त दंगा आणि अभ्यासाच्या वेळी अभ्यास असतो..
आज शीवानी बोलत होत्या तो विषय तुमच्याशी शेअर करावा वाटला.. त्यांचं म्हणणं होतं की , एखाद्याबद्दल आपल्या मनात आलेले वाईट विचार हे त्या व्यक्तीपर्यंत पोचतात आणि त्या व्यक्तीला तिकडे लो फील होतं.. आणि त्याचं पाप आपल्याला लागतं.. मी भगवदगीता अभ्यास करत असल्याने मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आत एकच परमात्मा वास करतो त्यामुळे कदाचित आपले चांगले वाईट विचार समोरच्यापर्यंत पोचत असावेत.. पण आजच श्रीमदभागवतम सुरु केलय .. त्यांचं म्हणणं प्रत्यक्ष चुकीच्या कृतीने पाप लागतं..
काही जणाना हा विचार पटणार नाही पण मी प्रचंड पॉजीटीव्ह आहे आणि एखाद्या घटनेकडे किवा परिस्थितीकडे चांगल्याच नजरेने पहाण्याची सवय असल्याने मी विचार केला की शीवानीजी बोलतात ते खरं मानु म्हणजेच माझ्या मनात कधीच कोणाबद्दल काहीच वाईट येणार नाही..याचाच अर्थ मी माझ्या वाचकाना सांगेन असं जर खरच असं होत असेल तर आपण सोशल मिडीयावर कोणावर व्यक्त होताना काय पध्दतीने व्यक्त व्हायला हवं याचा जरुर विचार करावा..कारण मंडळी अनेकदा अनेक लोकांवर वाचु नये इतक्या वाईट कमेंट करत असतात आतापासुन शिवानीजी सांगतात तो विचार फॉलो करायला काहीच हरकत नाही.. कधीही कोणाकडून चांगलच घ्यावं.. चांगलच पहावं आणि चांगलच बोलावं..
If you change your vision and thoughts
Automatically whole world will change..
निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्हीटीच पसरवते..यामुळे या क्षणापासून पाऊल उचलताना आणि व्यक्त होताना आपण जरुर विचार करायला हरकत नाही.. त्यामुळे कमी बोला आणि जास्त ऐका..

सोनल गोडबोले.. लेखिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *