‘चॉकलेट बॉय’ रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड.

 

दमदार अभिनयाबरोबर,अत्यंत देखणेपण,तसेच रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा धनी असलेले.रविंद्र महाजनी मराठी चित्रपटाद्वारे ते घराघरात पोहचत त्यांनी आपला आगळा वेगळा ठसा रसिक मनावर उमटवला.आपले शिक्षण पूर्ण होताच रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब आजमाविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.वडिलांच्या निधनानंतर कुंटुबाची आर्थिक जबाबदारी त्यांनी उचलली.त्यासाठी काही काळ त्यांनी छोटी-मोठी कामे केली.काही वर्षे टॅक्सीसुद्धा चालवली.एका संपादकांचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून नातेवाइकांची पण बोलणी त्यांना खावी लागली.तरी त्यांनी आपले सारे लक्ष्य ध्येयावर कायम ठेवले.मधुसुदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना खर्‍या अर्थाने पहिली संधी मिळाली.आणि त्यांनी पुन्हा कधीच माघे वळून पाहिले नाही.आपल्या कारकीर्दीत रवींद्र महाजनी यांनी हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये देखिल अभिनय केला.व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या इ.स. १९७५ सालच्या मराठी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केलेत्यांचे लक्ष्मीची पाऊले, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, देवता, कळत-नकळत, हे चित्रपट विशेष गाजले.त्याचबरोबर त्यांनी रविंद्र महाजनी यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केलं.
आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं.मराठी चित्रपटसृष्टी आणि त्यांच्या अभिनयाचे चाहाते त्यांना कधीच विसरु शकणार नाही.

 

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *