किती सुंदर आहे ना सगळं आणि हे कुठल्याही वयात होवु शकतं.. तरुण असताना आपण प्रेमात पडतो आणि वेड्यासारखे वागतो .. आणि मध्यम वयात सुध्दा आपण असाच वेडेपणा करतो..
स्मिताच्या wp वर त्याचा असाच काहीसा मेसेज येतो .. किती दिवस तुला पहातोय , तुझ्याशी मनातल्या मनात बोलतोय आणि आज तुझा फेसबुकवर फोटो पाहिला आणि तुझ्या सोसायटीमधे रेंगाळण्याचा मोह मला आवरला नाही..वाटलं एकदा लांबून तुला पहावं आणि निघुन जावं..
तुझ्या टेरेसबाहेर फोनवर बोलत रेंगाळत राहिलो आणि नजर किचनच्या खिडकीत गेली..काळ्या सॅटीन नाईटीमधे ओटा पुसताना सुध्दा तु तितकीच मादक दिसत होतीस.. ५० च्या उंबरठ्यावर असलीस म्हणुन काय झालं , खिडकीत तुझ्या मोठ्या मुलाला पाहिलं आणि वाटलं , खरं तर चोरुन प्रेम करायचं वय त्याचं आहे पण मी मात्र त्याच्या आईवर लाईन मारतोय..
थोडं ओशाळल्यासारखं झालं पण तुला पाहुन मी मात्र पुन्हा तरुण झालो.. घरी जाऊन केसांना रंग लावावा वाटला.. टीशर्ट घालुन पोट आत घेउन फोटो काढावे वाटले.. सकाळी उठुन रंनींग करावं वाटु लागलं.. संसारात आलेला फटीग तुला एकदा तुला पहाण्याने निघुन गेला.. किती सुंदर आहेस गं तु..तुझे बोलके डोळे ,कुरळे केस ( रंगवलेले ) तरीही त्यात कलरफुल झलक आहे.. मला तुला स्पर्श करायचा नाही तर फक्त लांबूनच न्याहाळायचय.. दुरुनच प्रेम करायचय.. अगदी तुला न्याहाळताना दोन ओळीही सुचल्या..
फार नाही मागणे
दुरुनच तुला पहाणे
विरहाची आग शमवणे
माझे डोळे थोडे निववणे
च्यायला मी कवीही बनु लागलो… सगळीच प्रेमाची ताकद शाळेत असताना निबंध लिहायला कंटाळणारा मी आज चक्क चारोळी… तिला माहीतही नसेल मी तिला पाहुन निघुन आलोय म्हणुन हा लिखाणाचा घाट… आशा आहे माझ्या लेखणीतुन माझ्या भावना तिच्यापर्यत पोचतील..
माझी स्मितुडी..
सोनल गोडबोले.. लेखिका