काहीही कोणाला देताना किवा दान केल्यावर ते विसरुन जावं.. त्याबद्दल कोणालाही काहीही सांगत बसु नये.. कधीही अन्नदान असेल तर उत्तमच.. अनेक लोकाना रोजच्या अन्नाची गरज असते आणि आपण ते देउही शकतो..
पण हुंडा देणे किवा जावयाला अधिक मासाचं वाण कर्ज काढुन देणं आणि त्यासाठी आयुष्यभर कर्ज फेडत बसणं याने नक्कीच पुण्य मिळणार नाही उलट त्याचा आपल्याच मुलीला त्रास होतो आणि सासरच्यांची हाव अधिक वाढते.. काही प्रथा आहेत म्हणजे तिथे सोनं किवा हिरेच दिले पाहिजेत असं नाही .. चुकीच्या प्रथा पाडुही नका आणि पाळुही नका.. त्या मागील विचार किवा मर्म जाणुन घ्या… लग्नात भरपुर तोळे सोनं देउन मुलगी सुखी रहाणार आहे की तिला चांगले विचार आणि शिक्षण देउन ती सुखी रहाणार हाही विचार व्हायला हवा..
लग्नाच्या आधीच या सगळ्या गोष्टी बोलुन घेतल्या तर नंतर होणारा मनस्ताप थांबतो.. प्रेमविवाहात सुध्दा त्या मुलीने आधीच काही गोष्टी क्लीअर करुन घ्याव्यात.. जावयाचा मान ठेवणे हा या मागचा उद्देश आहे मग तो मान शब्दांनी ,प्रेमाने आणि आपल्याला प्रेमाने जे देउ वाटेल त्याने करावा.. मुलाकडूनही अवास्तव मागण्या मागितल्या जाऊ नयेत कारण मुलगी नोकरी करत असेल तर तो पैसा सासरीच रहातो ना .. मुलगी कायमस्वरुपी दिलेली असते मग अजुन काय हवे ??..
हुंडा किवा अशा प्रकारच्या अपेक्षा ही सुध्दा क्रूरता आहे त्यामुळे दानधर्म करुन पुण्य गोळा होण्याऐवजी पापाचे भागीदार होवु नका.. कारण या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी या ना त्या प्रकारे हिसकावून घेतलेलं परत द्यावच लागणार आहे त्यापेक्षा कुठलीही गोष्ट प्रेमाने मिळेल ती घ्या.. आणि आधी द्या..
माझी आई करते म्हणुन मी करते किवा सासु करते म्हणुन मी करते यापेक्षा त्या का करतात. यामागे शास्त्र काय आहे ??.. दानाचं महत्व काय ??.. या सगळ्याचा सारासार विचार प्रत्येक घरात व्हायला हवा.. ज्या गुरुजीकडुन आपण पुजा सांगुन घेतो ते गुरुजी सगळ्या गोष्टी पाळतात का याची खात्री करुन घ्या.. कारण पौरुहित्य करणाऱ्यानी मांसाहार , ड्रींक , व्यभिचार यापासुन दुर राहीलं तरच आपल्याला त्याचं पुण्य मिळेल आणि गुरुजीनाही मिळेल.. शास्त्र जाणुन घ्या.. आता मी भागवतम ऐकतेय त्यात सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत.. डोळे झाकुन सण समारंभ साजरे करु नका.. आणि हो जरुर सत्पात्री दान करा..
सोनल गोडबोले