कंधार : प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील माळाकोळी – वाघदरवाडी- चोंडी प्राजीमा-५९ दगड सांगवी- उमरज रा.मा ५६ प्राजिमा ६८ तळ्याचीवाडी ते प्राजिमा ६९ पर्यंत रस्ता प्रजिमा-१३३ किमी १८/७३० ते २५/४८० रस्त्याची पुलमोऱ्यासाह सुधारणा (रामा ५६- ढाकु तांडा- दत्तटेकडी ) करण्यात यावे या मागणीसाठी भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांच्या पाठपुराव्याने खासदार सुधाकर शृंगारे यांनी दि.२६ रोजी बुधवारी दिल्ली येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत मा. नितीन गडकरी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
कंधार तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग १३३ हा रस्ता कंधार तालुक्यातील रहदारीसाठी महत्त्वाचा रस्ता असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून यातील काही तांड्यातील लोकांचा रस्त्याविना हाल होत आहेत आतापर्यंत रस्त्याविना फरफट होत आली आहे जनसामान्य लोकांना अतिशय दगडगोठ्या तुन प्रवास करावा लागतो. या रस्त्याची सुधारणा झालेली नाही या रस्त्यावर श्री संत नामदेव महाराज संस्थान उमरज,देवस्थान असून दत्त टेकडी येथे दत्त मंदिर आहे या तीर्थस्थळावर भाविकांची रेलचे मोठ्या प्रमाणात असते दत्त टेकडी ते ढाकू तांडा रा.मा. ५६ ते पाताळगंगा उमरज दगड सांगवी, चोंडी, माळाकोळी या परिसरातील नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे तरी नामदार नितीन गडकरी यांनी रस्ता केंद्रीय मार्ग निधी योजनेत समाविष्ट करून या रस्त्याची पूल मोरयासह सुधारणा करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
या रस्त्याचं काम झाल्यास कुरुळा सर्कल सह खेमा तांडा भोजू तांडा रामा तांडा, किशन तांडा, या सर्व रस्त्यापासून वंचित असणाऱ्या परिसरांना त्याचा फायदा होणार आहे ,अनेक वर्षा पासून या रस्त्याला जिल्हा मार्ग क्रमांक मिळावा म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे या रस्त्याला १३३ क्रमांक मिळाला असून जिल्हा प्रमुख मार्ग क्रमांक १३३ या रस्त्यास केंद्रीय मार्ग मंजूर करावा म्हणून , केंद्रीय मंत्री मा. गडकरी यांना विनंती केली असल्याचे _________ बोलताना राठोड यांनी सांगितले.