माझ्या मित्राने सांगितलेला मजेशीर किस्सा ऐका..
त्याच्या मैत्रीणीला घेउन तो लॉंग ड्राइव्हला जातो…
पावसाळी वातावरण कुंद आणि धुंदही.. शेजारी हॉट सीटवर बसलेली हॉट मैत्रीण .. खरं तर त्याला कायमच त्या सीट बेल्टचा राग येतो कारण तो तिच्या उरोजाना स्पर्श करतो म्हणुन तो सीटबेल्ट सीटलाच अडकवतो.कधी कधी वाटतं ( त्याला ) मीच सीटबेल्ट का नाही??..
बाहेरुन पाण्याचे तुशार काचेवर आदळत असतात आणि आत त्याची चाललेली चलबिचल.. तो विचार करतो खिडकी उघडली तर हे नादिष्ट तुषार तिच्या घुंगराळलेल्या बटा ओल्या करतील आणि ती भिजली की तिला सर्दी होते.. पण खट्याळ वारं बाहेरून तिला खुणावत असतं म्हणुन ती काच खाली घेते आणि वारा असा काही आत येतो की त्यासोबत पाऊसही मोह आवरु शकत नाही.. तिच्या छातीवर पडलेले मोती ( तुषार ) त्याला ओठाने टिपायचे असतात म्हणुन तो खिडकी बंद करतो
आणि तिला मिठीत घ्यायला जाणार इतक्यात तिला कसला तरी आवाज येतो.. तो आवाज कारमधुन पाठीमागच्या सीटवरुन येतो.. ती मागे वळते आणि जोरात ओरडते ,” काय रे माझी सवत घेउन आलास का ??.. तु असाच आहेस..सगळे पुरूष सारखेच.. मी इतकी सुंदर आहे , हॉट आहे तरीही तुम्हाला कोणीही आवडतं.. त्याला काहीही कळत नाही..
तो म्हणतो , अगं काय झालं??.. मागे कोणीच नाही.. भुत पाहिलस की काय ??
त्यालाही मागे असलेल्या छत्रीवर सरसर असा आवाज येतो .. मागे वळुन पहातो तर कारमधे चिचुंद्री असते .. दोघेही घट्ट एकमेकांना बिलगुन मनसोक्त हसतात.. तो खाली उतरुन चिचुंद्रीला कारमधुन बाहेर काढतो.. तितक्यातच पाऊसही थांबतो.. आणि तिच्या ओल्या बटान्मुळे तिला शिंका यायला लागतात .. हवा असणारा पाऊस त्यावेळी नको वाटायला लागतो.. त्या चिचुंद्रीला आताच कडमडायचं होतं का ??.. म्हणे सवत .. देवा ,काय हा छळवाद.. माझ्या रोमॅन्टिक डेट चं फदफदं ( अळुचं) झालं…
त्याने हा किस्सा सांगताच , मी जोरात फोनवर ओरडले . How sweet ना.. त्यावर तो म्हणाला , काय गं सोनल तिकडे उंदीर आला का ??.. मी म्हटलं , काश मी तिथे असते .. त्यावर तो म्हणाला , तु इमॅजीन करुन लिहायचं काम कर.. सावी ला अजुन एक सवत नको गं.. बघा मित्रांनो डेट वर जाताय तर सगळं नीट तपासून घ्या नाहीतर सवत यायची… आणि तीही चिचुंद्री.. सकाळी सकाळी भरपुर हसा आणि हा मजेशीर किस्सा मित्रांसोबत जरुर शेअर करा कारण हे काल्पनिक नसुन खरं घडलय..
सोनल गोडबोले..लेखिका