मैतेई (हिंदू) समाजाला दोन हजार वर्षांचा इतिहास असून ते राजांचे वंशज आहेत. मणिपूर राज्याची स्थापना वर्ष 1949 मध्ये झाली, तेव्हापासून मैतेई समाज आणि कुकी (ख्रिस्ती) समाज यांच्यातला संघर्ष चालू आहे. मैतेई समाजातील अनेक हिंदू बांधवांचे धर्मांतर होत आहे. मणिपूरमधील चुरचंदपूर येथे आता मैतेई उरले नाहीत. मणिपूरमध्ये ‘सांस्कृतिक नरसंहार’ होत आहे. मणिपूरच्या लोकांमध्ये फुटिरतेची भावना निर्माण करून मणिपूरसह भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न राजकीयदृष्ट्या प्रेरीत असलेले ‘यूरोपियन युनियन’ आणि विदेशी शक्ती करत आहेत. भारत जागतिक महासत्ता होऊ नये, यासाठी हे चालू आहे, असे प्रतिपादन ‘डिजिटल सनातन योद्धा’चे श्री. जनपीस यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने *‘मणिपूरमधील हिंसेमागे कोण ?’* या विषयावरील विशेष संवादात ते बोलत होते.
या वेळी *श्री. जनपीस पुढे म्हणाले* की, वर्ष 2008 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात मणिपूरमध्ये ‘सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स करार’ लागू केला. यात केवळ कुकी समाजाच्या बंडखोर गटाना शस्त्रास्त्र बाळगण्याची परवानगी होती; मात्र मार्च 2023 मध्ये हा कायदा भाजप सरकारने रद्द केला. तसेच मैतेई समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या संदर्भात न्यायालयाने निर्णय घेण्याचा आदेश दिला. यांसह मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात अफूची शेती करणार्या कुकी समाजाची अफूची शेतीही शासनाने नष्ट केली. ही मणिपूरमधील हिंसेमागील प्रमुख कारणे आहेत. ज्याप्रमाणे मध्य पूर्व आफ्रिकेतील देश रवांडा येथे 1994 येथे चर्चच्या प्रेरणेने 8 लाख लोकांचा नरसंहार केला गेला, त्याप्रमाणेच प्रयत्न मणिपूरमध्ये होत आहे का, हे पाहणे गरजेचे आहे.
या वेळी *‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीच्या पत्रकार जोजो नाक्रो नागा* म्हणाल्या की, मणिपूरमध्ये मैतेई समाज हा बहुसंख्य नाही, तसेच भौगोलिकदृष्ट्याही त्यांच्याकडे कमी प्रदेश आहे. मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीचा भारतविरोधी शक्तींनी फायदा घेतला आहे. विदेशी शक्तींनी कुकी समाजाला फूस लावून त्यांच्याकडून दंगली घडवून आणल्या आहेत. त्यामुळे मणिपूरमध्ये अनेक ठिकाणी मैतेई समाजातील लोकांनी पलायन केले आहे. मणिपूरमध्ये मे महिन्यात महिलांची विवस्त्र धिंड काढली गेली; मात्र याचा व्हिडीओ जुलैमध्ये संसदेचे कामकाज चालू असतांना सोशल मीडियावर प्रसारीत करण्यात आला. यातून हे सर्व राजकीयदृष्ट्या प्रेरित होते, हे लक्षात आले. मणिपूरच्या या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे; मात्र यातून जाणीवपूर्वक मैतेई समाज आणि सरकार यांना बदनाम केले जात आहे.
आपला नम्र,
*श्री. रमेश शिंदे,*
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.
(संपर्क : 99879 66666)