शिक्षक..भावी पिढीचा शिल्पकार…TEACHERS’ DAY SPECEL

शिक्षक..भावी पिढीचा शिल्पकार -” सब धरती कागज करुलेखणी सब बन रायसात समुंदर की गस्ती करु गुरु गुण लिखा न जाय,,,,!भारतीय संस्कृतीत गुरुला सर्वोच्च स्थानी बसवून त्याच्या तेजस्वीतेची पूजा करणारी आपली थोर परंपरा आहे.

गुरुमुळे माणसाला माणूसपण येते.व्यक्तीचा सर्वांगीणविकास,राष्ट्रांची चौफेर प्रगती ,समाजाचा सर्वागीण विकास,सुप्त गुणांचा विकास आणि भविष्याला आकार देणारी संस्कार संपन्न नी कर्तव्य निष्ठ पिढी तयार करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही,,,

भारतीय संस्कृती ही बुद्धी प्रधान संस्कृती आहे.निसर्ग ज्या प्रमाणे गाजावाजा न करता काम करित असतो व फळे , फुले फुलवित असतो त्याच प्रमाणे गुरुजन देखील निमुटपणे आपले कार्य करित इतरे जनांमध्ये केवळ आनंद निर्माण करित असतात.

गुरुच्या प्रति आदरभाव व्यक्त करणे व त्यांचे ऋण फेडणे त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञता व्यक्त करणे ही प्रतेकाची श्रेयस वप्रेयस भूमिका असाते.व यातुनच समाज व राष्ट्र उदयास येत असते व याला कारणमाञ असतात ते श्रेष्ठ गुरुजन ,देश आणि समाज ,वर्तमान आणि भविष्य ,वास्तव आणि स्वप्न यांना आकार देण्याचे खरे सामर्थ्य ते फक्त आणि फक्त शिक्षकामुळे.

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण च आवश्यक का? याचाही विचार करावा लागेल.आणि त्यासाठी अध्यापणाला धर्म मानणाऱ्या शिक्षकांचीही अटळता आपल्याला लक्षात येऊ शकेल.शास्ञाने प्रदेश जिंकता येते,पण मन जिंकता येत नाही .

सत्तेने प्रशासन जिंकता येते पण माणुस उभा करता येत नाही.पैश्याने माणुस विकत घेता येतो पण माणुस माणसासी जोडता येत नाही पण या सर्व गोष्टी शि-शिक्षणाने साध्य होतात.शिक्षक त्याला मुर्त रुप देऊ शकतात..स्वामी विवेकानंदजी म्हणतात .

व्यक्तीमत्वाची जडणघडण , चारिञ्याची बांधणी,कौशल्याचा विकास,मातृभूमीवरील प्रेम आणि मनांची श्रीमंती -समृध्दी ज्या मुळे घडते ते खरे शिक्षण होय असे म्हटले आहे.जपान,स्वीडन या सारखी राष्ट्रे सर्वाधीकखर्च शिक्षणावर करतात.14 ,15,16 वर्षाची मुले जपान मध्ये आपले शिक्षण स्वतःच्या पैशातुन पुर्ण करतात..

आपला भारत देश 15 आगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला .त्याच वेळी क्युबा हा देश पण स्वतंत्र झाला आणि 1948 लाच क्युबाने RTE- चा कायदा लागू केला . आता हा विस्कटलेला वर्तमान आणि झाकाळुन गेलेला भविष्य यांना आकार देण्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण देणारा शिक्षक कसा असावा याचा विचार करणे अणाठाई होणार नाही,शिक्षणाचे सामर्थ्य त्याचे स्पशित्व आणि त्याची माणुस घडविण्याची क्षमता ओळखणारा शिक्षक आसेल तरच शिक्षणाचीही सफलता आपणाला जाणवेल.अध्यापण हा पोटार्थी धंदा नसुन तो धर्म आहे.

अध्यापन ही समर्पित भावनेने करावयाची उपासना आहे. परंतू काही बुरख्या आड लपून शिक्षकी पेशाला बदनाम करण्यासाठी काहींनी बोगस च्या कुबड्या चा वापर करुन सर्व शिक्षण यंञणेला बदनाम केले..असे शिक्षक विद्यार्थ्यांना काय आदर्श पाठ शिकवणार. यांच्या कडुन कोणती मूल्ये शिकण्यासारखी आहेत.

आपल्या फायद्यासाठी दुसऱ्या च्या मानेवर पाय देणारे गुरुजी समाजासाठी काय आदर्श ठरतील..म्हणून तर समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.शिक्षकाचा वापर नेते मंडळी करुन घेत आहे, शिक्षणात राजकारण जास्त आणि राजकारणात शिक्षण कमी असे चिञ पाहावयास मिळते.. विद्यार्थ्यांच्या चित्तापेक्षा वित्ताकडेच जास्त लक्ष केंद्रित होताना दिसतो..

त्यामुळे शिक्षणात जिसकी लाठी उसकी भैस म्हणण्याची वेळ येते. आणि लबाड बांधती ईमले म्हाड्या.आणि गुणवंताना झोपड्या असे म्हणण्याची वेळ येते .समाजात अतिशय गुणवंत शिक्षक आहेत .त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे आवश्यक आहे.पण बिचाऱ्या शिक्षकांनी फक्त आध्ययन -अध्यापणाचेच काम करावे.. आणि बाकीच्यांनी नेतेगिरी करत फिरावे .चारित्र्य वान शिक्षक हे शाळेचे वैभव असते.आज शिक्षका मध्ये वाढती व्यसनाधिनता झपाट्याने वाढत आहे.

विद्यार्थ्यांसमोर गुटखा,पुडी तथा धुंम्रपान सर्रास चालु आहे तथा विद्यार्थ्यांना काही शिक्षक तोटा,पुडी दुकानातुन आणायला लावतात.या बाबी टाळता येतात. आज काल ब-याच वेळेस पेपरमधुन ‘शिक्षकाकडुन ‘छेड-छाड ‘अशा आशयाची वृत्ते वाचावयास मिळतात .

मग अशा गुरुजनाकडुन समाजाने काय आदर्श घ्यावा? आपल्या देशाला Dr.बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले,सावित्री बाई फुले, डा.सर्वपल्ली राधाकृष्णन ,सानेगुरुजी यासारख्या थोर पुरुषांचा वारसा लाभला आहे.शिक्षण प्रक्रियेत शिक्षकाला मोलाचे स्थान आहे, परंतु काहींच्या वाईट वागणूकी मुळे शिक्षकाची धार समाजात कमी होत चालली आहे.

आज शिक्षणक्षेञात मोठा मासा छोट्या माशाला खात आहे . आपली जी व्यावसायिक जबाबदारी आहे त्याकडे दुर्लक्ष करुन साईड बिझनेस च्या मागे धावत आहे, डा.बाबासाहेब आंबेडकर ,डा.सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा फुले.

सावित्री बाई फुले, फातीमा शेख, जगतज्योती महात्मा बसवेश्वर, साने गुरुजींनी या महान विभूतींनी आपल्याला दिलेली शिदोरी जर आम्ही सर्वांना वाटली ,त्याचे विचार ,आचार आंगी बाणले तर कोणतीही समस्या उदभवणार नाही..

“जरी असशील तू आजचा विद्यार्थी !तुझ्याच हाती असे उज्वल भविष्य निर्मिती ध्येय आसावे उरी तुझ्या ,राष्ट्रांच्या अखंडतेचेरुन फेडावेस तू,या मातृभूमीचे.!आपण सामाजिक अभियंते आहोत .समाजाचे आपण काही देने लागते ,म्हणून तन-मन तथा जीव लावून किमान 50%तरी काम ईमानईतबारे काम करावे नव्हे आपण करतोच कारण आजकाल आनलाईन तथा अशैक्षणिक कामाचा बोजा खूप पडाला आहे.

तरीही सेवाभाव म्हणून काम करावे…सद्याची परिस्थिती फारच बिकट आहे कोरोना विषाणू सारख्या महाभयंकर संकटाने शैक्षणिक ,सामाजिक ,आर्थिक चक्र बिघडले आहे…तरीही शासनाने दिलेल्या शैक्षणिक सुचनांचे पालन करुन जो काही online अभ्यासक्रम देता येईल तेवढे देण्याचा आपण प्रयत्न करु( स्वतः बचाव करुन)”नव्या दिशेचे ,नव्या युगेचे ,गीत सुर हे गाती.या मंगल देशाचे भाविष्य आपुल्या हाती,,,,

*** शिक्षक कसे असावेत.***

शिक्षकाचे प्रमुख कार्य शील संवर्धन आहे.याचा सर्व शिक्षकांनी अंगीकार करावा.शिक्षकामध्ये नवचैतन्य असावे.नवनिर्माणक्षमता असावी.विद्यार्थ्यांचे हित सतत जपणारे व आपल्या विषयाची ज्ञानसाधना सतत करणारे उत्साही शिक्षक असावेत.

निष्कामभावाने सेवा करणारे असावेत. शिक्षक विद्यार्थीनिष्ठ असावा.विद्यार्थी ज्ञाननिष्ठ असावा.चांगला विद्यार्थीनिष्ठ शिक्षक हा संवादातुन ,आचरणातुन चारित्र्यातुन मनाची श्रीमंती असलेला असलेला शिक्षक कर्तबगार विद्यार्थी घडवू शकेल.

आपल्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान आसलेला व शिकवत असलेल्या पाठाचे परिपूर्ण अभ्यास करुनच वर्गात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वा माहिती देणारा असावा..आज जरी शिक्षणक्षेञाकडे वा शिक्षकाकडे पाहण्याचा शासनाचा वा समाजाचा दृष्टिकोन फारसा चांगला नसला तरी.

व्रतस्थ दृष्टिकोन व सामाजिक रुणांची फरतफेड म्हणून का होईना म्हणून आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहुन ज्ञानदान करावे म्हणजे आपण निवडलेला व्यवसाय वा सेवा ख-या अर्थाने सार्थक झाल्याचा आनंद होईल.

.”है भाग्य आपणा ,अंधेरा मिला है..शमा बनके जलने का मौका मिला है.भले कितना ही हो अंधेरा,हमे टिमटिमानेका मौका मिला है !!

युसूफ शेख आंबुलगेकर 

राज्यनिष्ठा तज्ज्ञ ,

कंधार /नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *