लोहा ; प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीत सण अन् उत्सवाला अन्यन्य साधारण महत्त्व आहे.त्यातच बहिण भाऊ यांच्यातला स्नेह रक्षाबंधन सणाला वृध्दींगत होते.बहिण भाऊरायास राखी बांधुन आपल्या रक्षणाचे साकडे घालून औक्षण करते.भारत मातेचे सीमेवर रक्षण करणारा शूर जवान आपल्या कुटूंबा पासून दुर राहून आमच्या भारत देशाच्या सीमावर्ती भागात खडा पहारा देत रक्षण करतात म्हणून आपण आपल्या देशात सुख आणि चैनचा श्वास घेतो. गेली दहा वर्षापासून सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारच्या माध्यमातून मन्याड व गोदा खोर्यातील स्फूर्तिदायक उपक्रमातून शालेय भगीनींच्या ३३३३ राख्या व ३३३३ सदिच्छापत्र सोबत १५ फुटाची राखी भारतीय सीमेवर विविध बटालियनला कंधार पोलिस स्टेशन येथे कार्यक्रम घेऊन भारतीय डाक सेवेच्या करवी पाठवीत असतात.या उपक्रमात यावर्षी लोहा शहरातील नारायणा इंटरनॅशनल स्कूल या ज्ञानालयातील शालेय भगीनी सहभागी झाल्या आहेत. या चिमुकल्यांनी आपल्या हस्तकलेतून सुंदर व आकर्षक राख्या बनविल्या आहेत.त्या राख्या आणि सैनिक बांधवांना रक्षाबंधनाच्या शब्दबध्द सदिच्छा मेरे प्यारे भारतीय सैनिक भाई आप आपणे परिवार से दूर भारतीय सीमओंपर तैनात रहकर खडा जागता पहारा देते हुए डटकर रक्षा करते है।यह आपका काम हमे बहुत पसंद है।इस लिए मै रक्षाबंधन त्योहार के उपलक्ष्य मे भैय्या आपको ढेर सारी शुभकामनाए देती हू। असा मजकूर सदिच्छा पत्रात सुबक हस्ताक्षरात लिहून भारतीय सीमेवर तैनात शूर सैनिक बांधवांना पाठविण्यास सज्ज आहेत.या देशभक्तीपर उपक्रमास प्राचार्य शिवाजी केंद्रे सर, व्यवस्थापक संतोष कुलकर्णी सर,वैशाली मिस, पाटील मिस,ऐश्वर्या मिस,मुसळे सर आणि सर्व स्टाफ यांचे सहकार्य लाभले.