भाजपा महानगर नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने ‘हर घर तिरंगा ’ या उपक्रमा अंतर्गत नांदेड शहरातील विविध भागातील घरांवर लावण्यासाठी २०२३ तिरंगे झेंडे वाटपाचा शुभारंभ भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आणि संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.
गुरुकृपा मार्केट येथील भाजपा महानगर कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष शितल खांडिल, अनुसूचित मोर्चा प्रदेश सचिव अभिषेक सौदे, परमवीरसिंघ मल्होत्रा, प्रतापसिंघ खालसा, सोशल मिडिया जिल्हा प्रभारी राज यादव, स्वप्नील गुंडावार, कामाजी सरोदे, हुकुमसिंह गहलोत, डॉ. सुनील मुंदडा हे उपस्थित होते. या वर्षी तिरंगे ध्वज देण्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यामध्ये
पोस्ट बचत एजंट संघटना प्रदेश उपाध्यक्ष सचिन शिवलाड, धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर,लायन्स माजी अध्यक्ष संजय अग्रवाल,विवेक सिंह गोरखपुरवाले पुणे, प्रा.जोगेंद्रसिंह बिसेन, माजी प्राचार्य प्रभाकर उदगिरे, अजय लक्ष्मणराव डहाळे सराफा,उर्मिला साजने यांचा समावेश आहे.भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले होते.त्यानुसार सतत दुसऱ्या वर्षी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, लायन्स प्रांतपाल ला. सुनील देसरडा, लायन्स ग्लोबल सर्विस टीम समन्वयक योगेश जैस्वाल,लायन्स सेंट्रल अध्यक्ष ॲड. उमेश मेगदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. स्वातंत्र दिनाच्या संध्याकाळी ६ वाजता सर्वांनी आपल्या घरावरील तिरंगे ध्वज काढून व्यवस्थित ठेवावे असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस दिलीप ठाकूर यांनी केले आहे.