कंधार ; प्रतिनिधी
कंधार नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा कंत्राटी कर्मचारी यांना गेल्या १० महिन्या पासूनचे वेतन मिळाले नसल्याने कंत्राटी पाणी पुरवठा कामगार यांनी गेल्या चार दिवसा पासून उपोषण कंधार नगरपालीके समोर पुकारले होते .
मागण्या सर्व मान्य व्हाव्यात म्हणून माजी सैनिकांच्या शिष्टमंडळाने पुढाकार घेतल्याने मुख्याधिकारी यांनी सकारात्मक चर्चा करून साडे तिन महिण्याचे वेतन तात्काळ देऊ केल्याने आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी उपोषण मागे घेण्यात आले .
दि 10.08.2023 रोजी नगरपरिषदेच्या समोर आपले थकीत वेतन मिळविण्यासाठी उपोषणाला बसले होते आज नगरपरिषद प्रशासनाने दखल घेऊन 105 दिवसाचे साडेतिन महीन्याचे थकीत वेतन काढले व शिल्लक वेतन लवकर करुन टाकु आसे आश्वासन दिले… म्हणून आज उपोषण तुर्तास माघार घेतले आहे….माजी सैनिक संघटना सतत तालुक्यात गोरगरिबांनसाठी लढत राहील आणी कोणावरती अन्याय होत असेल तर नक्कीच आवाज उठवुन न्याय मिळवून देण्याचे काम करेन असे आश्वासन यावेळी माजी सैनिक संघटणा जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी उपोषण कर्त्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना दिले .
यावेळी सय्यद अली, बालाजी निकम, परमेश्वर चौधरी, राहुल कदम, ज्ञानेश्वर चौधरी, कल्याण वाघमारे, बालाजी घोडजकर, विल केले, नागेश पवार, शिवाजी लुंगारे, नारायण लुंगारे, हनुमंत लुंगारे, केदार बोरकर, अनिल हकदळे, बळीराम कंधारे आदीसह कर्मचारी उपस्थित होते .