नवीन ट्रेंड…ट्रोलींग

रोज बाजारात नवीन ट्रेंड येतात .. कधी फॅशन , कधी डाएट , तर कधी काय.. सध्या वारं वहातय ते ट्रोलींगचं जो तो उठतोय तो न वाचता , न ऐकता , न पहाता , न जाणुन घेता फक्त आपलं घोडं दामवटतो आणि मी किती भारी किवा अरे मी त्याला किवा तिला ट्रोल केलं याचा आनंद घेतो..
पण जेव्हा त्यांच्या वॉलवर एखाद्या व्यक्तीला ट्रोल केलं जातं तेव्हा इतर मंडळीच्या मनात ती व्यक्ती कोण आहे म्हणुन कुतूहल दिसतं आणि मग ते लोक ज्याला ट्रोल केलं जातं त्याच्या वॉलला जातात आणि फॉलो करायला लागतात.. त्या व्यक्तीचा फॅन फॉलोवर वाढतो .. ती व्यक्ती कमी वेळात जास्त फेमस होते. सेलीब्रीटी होते आणि मनोमन ट्रोलींग करणाऱ्याचे आभार मानते कारण ती व्यक्ती जे काम करते ती मनापासून करते त्यामुळे त्याचे फायदे तिला मिळतातच..
२ दिवसापूर्वी मी एक रील शेअर केलं होतं.. मला सचिन ने करायला सांगितलं कारण लैगिकतेची जनजागृती आणि नात्यांची बांधीलकी हा उद्देश होता.राखी पौर्णिमा बहीण भावाचं पवित्र नातं हे प्रत्येकाला माहीत आहे.. पण ते दोघेही माणसं आहेत आणि त्या दोघानाही लैगिकतेचं ज्ञान असणं ही काळाची गरज आहे.. जर एक शिक्षक विद्यार्थीशी लैगिकतेवर बोलु शकतो , एक मुल आई वडीलांशी लैगिकतेवर बोलु शकतं तर एक भाऊ आपल्या बहीणीला पुस्तकातुन लैगिकतेचं ज्ञान देउन तिला अंधारातुन उजेडात आणु शकत असेल तर यात पवित्र आणि अपवित्र हे शब्द येतात कुठे ?? .. घाणेरडी मानसिकता तुमची आहे .. मी पवित्र काम करतेय.. आपल्या बहीणीच्या संसारात ती लैगिंकतेत सुद्धा सुखी समाधानी असेल तर तिचच आयुष्य सुखकर होइल.. ती तिच्या नवऱ्याला काही चांगल्या गोष्टी सांगेल.. ती तिच्या मुलांना लैगिकतेचं शिक्षण देइल.. सगळे फायदे असताना आपण हे असे का वागतो याचा विचार माझ्या वाचकानी जरूरकरावा..
तुम्हाला ट्रोल करायचय जरुर करा पण विवेक जागृत ठेवुन करा.. व्हीडीओ मोठा होतो म्हणुन मी डीटेल त्यात बोलत बसले नाही पण मी लैगिकतेवर काम करते हे तुम्हाला माहीत आहे.. तुम्ही पुस्तके वाचत आहात मग चौफेर विचार करणं हीच गरज आहे..
सोच बदलो.. देश बदलेगा..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *