Post Views: 79
नांदेड – अधिक मासामुळे यावर्षी आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेला नागपंचमी हा सण साजरा करण्यात आला असून जवळा देशमुख येथील चिमुकल्यांनी कार्यानुभव या विषयातील मातीकाम या सदरात मातीपासून नागोबा बनविण्याचे प्रात्यक्षिक केले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मातीकाम ही कार्यशाळा घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी मातीपासून नाग बनविण्याचा आनंद घेतला.
नागपंचमीच्या आदल्या दिवशी सुट्टी असतांनाही शाळेतील चिमुकल्यांनी चांगला प्रतिसाद दिला. शिक्षकांनी मातीपासून वस्तू कशा तयार करायच्या याचे प्रात्यक्षिक दाखवले. विशेषतः नागपंचमी साजरी करण्यासाठी नाग कसा तयार करावा याबाबतचे मार्गदर्शन केल्यानंतर अजिंक्य गोडबोले, राजवर्धन गवारे, अपेक्षा गोडबोले, मारोती गोडबोले, शिवानी शिखरे, शाश्वती गच्चे, स्वराज शिखरे, आर्या गच्चे, ज्ञानवी पांचाळ, मोनिका गोडबोले, आकांक्षा गोडबोले आदी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
या उपक्रमाचे कौतुक गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, शिक्षण विस्तार अधिकारी सरस्वती आंबलवाड, केंद्रप्रमुख नागोराव जाधव, केंद्रीय मुख्याध्यापक आनंदा नरवाडे, सरपंच कमलताई शिखरे, सामाजिक कार्यकर्ते साहेब शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, शालेय समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, मिलिंद गोडबोले, चांदू झिंझाडे, आनंद गोडबोले, मारोती चक्रधर, हैदर शेख, मनिषा गच्चे, डॉ. सुजाता गोडबोले, इंदिरा पांचाळ, सुलोचना गच्चे, सुमेधा शिखरे आदींनी केले आहे.