हजरत सांगडे सुल्तान मुश्किले आसान यांचा कंधार येथे ५८९ वा उर्स महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार…सज्जादा नशीन व मुतवल्ली सय्यद शाहा अनवारुल्लाह हूसैनी

कंधार : ( विशेष प्रतिनिधी , विश्वंभर बसवंते )

महाराष्ट्र व शेजारील राज्यातील
हिंदू मुस्लिम यांचे श्रद्धास्थान असलेल्या सूफी संत हजरत सय्यद शेख अली सांगडे सुल्तान मुश्किले आसान रह. अ. यांचा ५८९ वा उरूस महोत्सवाची अनेक वर्षापासूनची पारंपरिक सदभावना मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे सय्यद शाह अनवारुल्लाह हुसैनी रफाई कादरी सज्जादा नशीन व मुतवल्ली दर्गाह हजरत सांगडे सुल्तान मुश्किले आसान रह. अ. कंधार यांचे वंशज यांनी सांगितलेआहे.

पुढे बोलताना सय्यद शाह अनवारुल्लाह हुसैनी म्हणाले, हिंदू मुस्लिम यांचे श्रद्धास्थान असलेले प्रेम, शांती आणि बंधूत्व शिकविणारे महान “सूफी संत हजरत सय्यद शेख सांगाडे सुल्तान मुश्किले आसान र. अ.” यांचा उरुस महोत्सवातील कार्यक्रम असे दि.२६ ऑगस्ट २०२३ रोज शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता संदल मिरवणूक दर्गाह मधून निघेल व रात्री १०.०० वाजता दर्गाह परिसरात सूफी संत यांच्या महान कार्यावर प्रबोधनात्मक कार्यक्रम दि.२७ ऑगस्ट २०२३ रोज रविवारी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत “फातेहा का प्रसाद व भोजन” करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भाविकांना सांगण्यात आले, आणि सायंकाळी चिरागां चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, दि.२८ ऑगस्ट रोज सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता हजरत सय्यद शाह अजीमोद्दीन (शाह घडक) रस. अ. आणि स. शाह मोईनोद्दीन (शाह कडक) रस. अ. कंधार यांचा संदल व रात्री प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षी सूफी संत हजरत सय्यद शेख सांगडे सुल्तान मुश्किले आसान त्यांचा ५८९ वा उरूस महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे, तरी सर्व भाविकांनी गर्दी न करता शिस्तीने सूफी संत यांचे दर्शनाचे वेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी प्रत्येक भाविकांनी घ्यावी, आणि आप आपल्या घरी सुखरूप जावे, अशी अपेक्षा
व्यक्त केली आहे.
_________________________
सध्या पावसाळ्याचे दिवस असून,कंधार शहरातील दर्गाह शेजारील “जगतुंग तलावात” पाणीसाठा हा मोठ्या प्रमाणात असल्याने आपला हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून आनंद द्विगुणीत करावा,पण “जगतुंग’ तलावाकडे”आपण आपले नातेवाईक व लहान मुले यांना तलावाकडे जाण्यास प्रतिबंध करावा, असे आवाहन सय्यद शाह अनवारुल्लाह हुसैनी रफाई कादरी सज्जादा नशीन व मुतवल्ली दर्गाह हजरत सय्यद शेख सांगडे सुल्तान मुश्किले आसान यांचे वंशज यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *