गिरगाव: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दलित मित्र गंगारामजी कराळे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त गिरगाव येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात करण्यात आले होते सुरुवातीला अभिवादनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा समितीचे अध्यक्ष शंकरराव कराळे प्रमुख पाहुणे राजकुमार कराळे पत्रकार शंकर राऊत मुख्याध्यापक प्रकाश इंगळे पर्यवेक्षक चंद्रकांत राऊत यांची उपस्थिती होती .
“दोन बोटाच्या चिमटीतून बुळूबुळू सोडतात पीठ
बाप नावाचा येईल मांडवाला नेतात म्हायेराचा उद्धार रांगोळीत वतून भुरकन उडून जातात पोरी….” ही पोरीचं जगणं मांडणाऱ्या कवितेने कवी संमेलनाचे अध्यक्ष लोकबोलीचे अभ्यासक कवी शिवाजीराव अंबुलगेकर यांनी आगाज केला . बालाजी पेटेकर कवीने
“पटपळताळणीने आवळल्या सगळ्यांच्या नाड्या
पोर जमा कराया निघाल्या मास्तरांच्या गाड्या….’ या विडंबन काव्याने हास्य फिरत शिक्षण व्यवस्थेचे आजचे चित्र व्यक्त केले. कवी मनोहर बसवंते यांनी ग्रामीण भागातल्या शेळ्या वळणाऱ्या पोराचं प्रेम आपल्या कवितेतून मांडलं त्याच वर्षी तिचे हात पिवळे झाले मी उध्वस्त झालो आणि शेळ्या पोरक्या निखळ प्रेमाची परिभाषा मांडली
कवयत्री रुचिरा बेटकर यांनी,
“डोहात तुझ्या नयनाचा मी सूर कसा धरावा
अंदाज तुझा घेताना बघ अजूनही गडबड होते
हलकेच तुझ्या विरहाने अवकाळी पडझड होते…”या हळव्या भावनांना वाट करून दिली
रानकवी श्रीनिवास मस्के यांनी ,नागपंचमीच्या सणाला स्त्रियांना माहेराची ओढ लागलेली असते त्या हळव्या भावना व्यक्त करणारी
“माईच्या ग हाताची चटणी भाकर
सासरची सासर माहेर ते माहेर… “या माहेरपणाच्या आठवणी ताज्या केल्या.
कवी संमेलनाची सांगता कवी जगन शेळके यांच्या,
” जीवनाने नेतोस तू कोणत्या थराला पारखा होईल मी माझ्या घराला…”
जगणं मांडणाऱ्या भैरवीने केली कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन रानकवी श्रीनिवास मस्के यांनी केले तर आभार पर्यवेक्षक चंद्रकांत राऊत यांनी मानले
तर प्रास्ताविकात मुख्याध्यापक प्रकाश इंगळे यांनी कै. गंगारामजी कर्हाळे यांच्या आठवणी ताज्या केल्या शाळा समितीचे अध्यक्ष शंकराव कऱ्हाळे यांनी बाबांच्या समाजात प्रतीची निष्ठा व कवी संमेलन ठेवण्यामागची भुमिका व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.