कृषी विभागाच्या जन जागृती रथ अभियानाचा शुभारंभ

 

परभणी, दि.22  : निवास संस्था व रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी विभाग, तालुका कृषी विभाग परभणी यांच्याशी समन्वय साधून जनजागृती रथ अभियानाचा शुभारंभ कृषी अधीक्षक कार्यालय येथून आज (दि. 22) जिल्हा कृषी तंत्र अधिकारी निखिल चव्हाण व तालुका कृषी अधिकारी कैलास गायकवाड यांनी हिरवा झेंडा दाखवून केला.

यादरम्यान कृषी सहाय्यक अधिकारी विजय हतोळे, कृषी सहाय्यक अधिकारी व निवास संस्थेचे किशोर वानखेडे बालाजी लहाने, सुशिल गोरे, किरण उजगरे, मोनिका चव्हाण आदीच्या उपस्थितीत जनजागृती रथ या मोहिमेचा शुभारंभ झाला.

या अभियान दरम्यान परभणी तालुक्यातील 15 गावात हा जन जागृती रथ फिरणार आहे व गावातील शेतकऱ्यांना एकात्मिक शेती मॉडेल पद्धती, एकात्मिक किड व्यवस्थापन, हवामान बदल आधारित शेती कशी करावी, बी.बी. एफ तंत्रज्ञनाद्वारे पेरणीचे फायदे, बुम स्प्रे फवारणी करणे आणि ग्रामीण भागातील शेती पूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, सेंद्रिय शेती करण्यास प्रोत्साहन देणे, सागरिका या जैविक औषध याविषयी माहिती देण्यात येणार आहे. तसेच महिला सक्षमीकरण करण्यासाठी गावात डिजिटल साक्षरता अभियान राबविणे, माझी माती माझा देश अंतर्गत वृक्षारोपण करणे, शेती पूरक व्यवसाय प्रशिक्षण देणे असे विविध उपक्रम निवास संस्था व रिलायन्स फाउंडेशन यांच्या मार्फत ग्रामीण भागात राबविले जातात.

कृषी विभाग व निवास संस्था व रिलायन्स फाउंडेशन यांनी एकत्र मिळून जर ग्रामीण भागात काम केले तर त्याचा फायदा जगाचा पोशिंदा असलेल्या आपल्या शेतकऱ्यांना होईल यासाठी या जन जागृती रथ अभियान राबविण्यात आले आहे. या दरम्यान जिल्हा कृषी तंत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक अधिकारी, निवास संस्थेचे अध्यक्ष परशुराम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली निवास संस्थाचे परभणी तालुका समन्वयक किशोर वानखेडे, बालाजी लहाने, सुशिल गोरे, किरण उजगरे, मोनिका चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *