जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते 504 महिला बचत गटांना कर्ज वाटप

परभणी, दि. 23  : स्टेट बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे एसबीआय बँकेने कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये 504 महिला बचत गटांना 10 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, नांदेड स्टेट बँक ऑफ इंडिया उप महाव्यवस्थापक प्रियकुमार सरीगला, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, स्टेट बँक ऑफ इंडिया क्षेत्रिय प्रबंधक सम्राट पुरकायस्थ, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक उदय कुलकर्णी, जिल्हा अभियान व्यवस्थापक दीपक दहे उपस्थित होते.

 

श्री. सरीगला यांनी बचत गटांना बँकेतील कर्ज या पैशाच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी तसेच व्यवसायातून स्वत:चा कुटुंबाचा, तसेच गटाचा, गावाचा, विकास कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच स्टेट बँक सदैव तुमच्या व्यवसायासाठी, गटांसाठी पाठीशी राहील असा विश्वास व्यक्त केला.

 

यावेळी श्रीमती खांडेकर म्हणाल्या की, आजपर्यंत बचत गटांना कर्ज दिलेल्या कोणत्याही गटाने बँकेचे हप्ते थकवले नसून शंभर टक्के परतफेड केली आहे. यानंतरही स्टेट बँकेने दिलेला विश्वास सार्थ ठरवेल असा विश्वास व्यक्त करुन गटांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *