सौज्जवळ,दमदार अभिनयाची सीमा हरपली….

 

कशी झोकात चालली कोळ्याची पोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर

हे सीमा देव यांच प्रचंड गाजलेल गाणं.एक सौज्जवळ अभिनेत्री अशी त्यांची छाप होती.सदाबाहार अभिनयाच विद्यापीठ काळान हिरावलं.सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या.त्यांनी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले.
सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला आणि चित्रपटसृष्टीतील या अजरामर जोडीने कायम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.सीमा देव या शाळेत असतांनाच त्यांना नृत्याची प्रचंड आवड होती. कल्याणजी-आनंदजींपैकी आनंदजींच्या यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये त्या गाणं गात होत्या. गाणं आणि नृत्याची आवड यामुळेच त्यांची चित्रपटसृष्टीकडे अधिक ओढ होती. मात्र सारस्वत गौड समाजातील मुली-महिलांनी गाणे-बजावणे हा मोठा अपराध मानला जायचा,या काळात त्यांना असंख्य समस्यांचा सामना करत स्वता;ला सिध्द करावे लागले.सुमारे अर्धशतकाहून अधिक काळ मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत राहिलेल्या सीमा देव यांनी अभिनय आणि सात्त्विक व्यक्तिमत्वाच्या बळावर आपल्या कामाचा ठसा उमटवला.आज सीमा नावानं त्यांना सर्वजण ओळखतात. पण त्यांचे मूळ नाव निलीमा सराफ होतं.. ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटातून समूहनृत्यामध्ये नृत्य करणार्‍या नलिनी सराफ यांनी कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यासाठी चित्रपटांमध्ये प्रवेश केला.

 

भावंडांची जबाबदारी, डोक्यावर वडिलांचे छत्र नाही, अशा स्थितीत एकट्या कमावणार्‍या आपल्या आईला सुचिताला मदत करायची, या हेतूने चित्रपटात मिळेल ते काम स्वीकारले.सीमा यांनी रमेश देव यांची नायिका म्हणून सर्वप्रथम ‘ग्यानबा तुकाराम’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘माझी आई’, ‘सुवासिनी’, ‘सोनियाची पावले’, ‘मोलकरीण’ यात आपल्या अभिनयान सर्वांना भुरळ घातली आणि त्यांनी इथुन पुढे कधीच मागे वळून पाहिले नाही.

अभिनेते रमेश देव यांच्याबरोबर प्रेमविवाह झाल्यानंतर सीमा देव यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेऊन स्वत:ला संसारात गुंतवून घेतले.त्या आदर्श पत्नि आणि आदर्श आई देखिल झाल्या.पडद्यावर देखिल त्या आदर्श बहिण,उत्कृष्ठ गृहिणी म्हणून काम केले.त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला,
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार. (२०१७)मध्ये मिळाला होता.
मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे दीर्घ आराजाने निधन झाले.त्या ८१ वर्षांच्या होत्या.त्यांच्या जाण्याने कलाविश्वावर शोककळा पसरली असुन चित्रपट सृष्टीतील सोनेरी पान काळान हिरावल.

 

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *