पत्रकारांवर हल्ला म्हणजे, माध्यम स्वातंत्र्य धोक्यात, नागरीकांनो वेळीच सावध होण्याची गरज ! 

 दिवसेेंदिवस राज्यामध्ये  व देशामध्ये, पञकारावर दिवसाढवळ्या भररस्त्यात जीवघेणे  हल्ले होत आहेत, पण शासन माञ याकडेे  गांभीर्याने पाहात नाही.    आतापर्यंत      पञकार संरक्षण कायद्यांतर्गत  किती जणांवर   कारवाई   झाली. कारवाईनंतर किती लोकांना  शिक्षा झाली याच्या खोलात जायायचे नाही.  पण  शासन माञ  नुसता  कारवाचाईचा फार्स दाखवुन  गुन्हेगाराला पाठीशी घालत आहे.   त्यामुळे गून्हेगाराला  कायद्याची  भिती राहीली नाही.   म्हणुन   गुन्हेगाराला  बळ मिळत   असल्याने  पञकारावर   सतत   हल्ले होत  आहेेत.

.        यामध्ये  कांही पञकार चुकत असतील पञकाराची  चुक  नाही.  असे म्हणता  येणार नाही. पण चुक झाली  म्हणुन हल्ला करणे योग्य आहे का ?  मानव   जन्म आहे चुक होऊ शकते. खरच      तुमची बदनामी झाली असेेल   तर  त्यांच्यावर कारवाई करा ,कायदा कशाला हातात घेता कारण     सत्ता  तुमच्या हातात आहेे म्हणुन  एवढं धाडस  करणं योग्य वाटते  का ?    तुम्ही चांगले    काम केल्यानंतर  चांगली  अपेक्षा   पण   बोगस काम केल्यानंतर  उत्कृष्ट कामाची अपेक्षा कशाला करता. पञकाराकडे  समाजातील  सर्वाच्या नजरा असतात त्यामुळे सत्य तेच समाजापुढे  पञकारांना मांडावे लागते.   गुंडगीरीच्या माध्यमातुन लोकप्रतिनिधी आणि भांडवलदार हे   प्रसार माध्यमावर  दबावतंञाचा वापर करुन  प्रसारमाध्यम    ताब्यात घेण्याचा एक प्रकारच आहे.  पञकारावर हल्ले  केल्यामुळे  प्रसार माध्यमावर  दबाव  येवु शकतो ,  प्रसार माध्यमावर दबाब आल्यानंतर  प्रसारमाध्यम   आपल्या मुठीत आपोआप येवु शकतात. अशा भावनेेतुन  पञकारावर  हल्ले  घडविले जातात.   लोकप्रतिनिधी आणि भांडवलदार आपले कारनामेे  लपवण्यासाठी असे हल्ले   घडविले  जातात.   असेे म्हटले तर वाावगे ठरणार नाही.पण अशा प्रवृतीमुळे माध्यम स्वातंञ्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरीकांनी  आणि   पञकारानी वेळीच सावध होणेे  आता   काळाची   गरज  आहे.  कांही  स्वाभीमानी पञकार व प्रसारमाध्यम  सोडले तर   कांही पञकार  लोकप्रतिनिधीची आणि भांडवलदाराची लाचारी आणि  हुजरेगीरी करण्यास आजही पटाईत आहेत    त्यामुळेच  लोकप्रतिनिधी  आणि  भांडवलदारानां बळ  मिळत  आहे . 

म्हणुन    अशा       पञकारानी सावध  होणे आता   काळाची गरज आहे. नाही तर   भांडवलदार आणि लोकप्रतिनिधीना माहित आहे.  एकाचा बंदोबस्त केला की दुसरा मान वर करत नाही.  त्यामुळे आपल्या दुकानदारीला धोका नाही. म्हणुन असे प्रकार घडतात आणि घडविलेे जातात पण राज्यकर्त्याना याचे कांही वाटत नाही. पञकारांना जर  कांही झालेच तर शासन  पञकाराच्या  कुुटुंबाला थोडीफार  मदत जाहीर करुन चौकशी करु अशी  घोषणा करुन मोकळे होतात.  त्यापलीकडे कांही होत नाही हा आजवरचा  इतिहास आहे. पञकार  आणि   प्रसारमाध्यम  ज्या दिवशी पञकारावर हाल्ला झाला त्याच  दिवशी  थोडी  ओझरती बातमी दाखवुन  अधिकार्‍याना निवेदन देवुन   निषेध व्यक्त करुन   मोकळे होतात. पण  त्या  बातमीचा शेवट           लागेपर्यंत  पाठलाग   करताना दिसत नाहीत. त्यामुळे   भारतीय सविंधानाने  चौथ्या स्तंभाला दिलेला अधिकार  आता धोक्यात   आला  आहे   हेच   यावरुन स्पष्ट होताना दिसते. 

 

      समाजामध्ये   लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन पञकाराकडे पाहिल्या जाते. पञकार आपला जीव धोक्यात घालुन समाजातील चांगल्या वाईट घटनेचे वृत्तांकन करुन वाचकापर्यंत पोहचविण्याचे काम  प्रामाणिकपणे पञकार करतो , सामान्य माणसांना न्याय मिळवुन देण्याचे काम पञकार नियमितपणे करतात. ज्यांना पाठबळ नाही. अशांचा पाठीराखा होऊन त्यांच्या पाठीशी खंभीरपणे ऊभा  राहातो  पञकारीतेच्या माध्यमातुन शासन दरबारी पञकार समाजाची वकीली करतो.  आणि  बहीर्‍या  मुक्याचा    आवाज म्हणजे पञकार होय, सामान्य माणसाचे प्रश्न जनतेसमोर मांडुन तो प्रश्न शासनापर्यंत आपल्या लेखणीच्या माध्यमातुन पोहचविण्याचे काम  पञकार करतात.समाजात पञकार म्हटलं की प्रत्येकजण   ज्याच्या त्याच्या नजरेतुन  पञकाराकडे  पाहात असतात. 

पञकारीता न्याहाळत असतात. आणि पञकाराच्या पञकारीतेचे मूल्यमापन दिवसेंदिवस  जनता करीत असते त्यामुळे पञकारांनी  कोणत्याही बातमीची  सत्यता शोधुनच त्या बातमीची    सत्यता जनतेसमोर मांडणे व स्वच्छ पञकारीता करणे  ही पञकाराची  खरी ओळख आहे. पण सत्य पञकारीता  करीत असताना सुध्दा, सत्य लिहीत असतानासुध्दा पञकारावर मोठे हल्ले होतात. एकाद्याने चुकीचे काम केले ते चुकीचे काम केले हे सत्य आहे.  हे  सत्य लिहीत असताना   सुध्दा ज्यानी चुकीच काम केल त्याना हे खपत नाही म्हणुन मनात राग धरुन कांही राजकिय पक्षाचे नेते व पदाधिकारी    व  कांही धर्मांध संघटनेला  हा चौथा स्तंभ आपल्या कार्यात अडसर येवु नये म्हणुन आपली दुकानदारी शाबुत ठेवण्यासाठी प्रसार माध्यमावर दबाव आणुन पञकाराना वेठीस धरुन ,पञकारावर हल्ले करीत असतात  म्हणुन  अशा प्रवृतीपासुनच  लोकशाहीला मोठा धोका आहे.  लोकशाही वाचवायची असेल तर प्रसार माध्यमावर कोणत्याही भांडवलदाराचे  किंवा राजकिय पक्षाचे वर्चस्व नको. निरपेक्ष पञकारीता करता आली पाहीजे. म्हणुन मला  या देशातल्या नागरीकाना  सांगायचे आहे.  आपल्या देशातली लोकशाही धोक्यात आली आहे.  भारत देश लोकशाहीतुन हुकुमशाहीकडे वाटचाल करीत आहे. 

 

नागरीकांनो राज्यकर्त्याच्या  प्रलोभनाला बळी न पडता   लोकशाही आबाधित ठेवण्यासाठी भारतीय संविधानाने प्रत्येकाला   दिलेला अधिकार शाबुत ठेवण्यासाठी प्रत्येकानी आत्मपरीक्षण करुन निर्णय घेण्याची वेळ आली आहे. असाच दबाव तंञाचा वापर करुन  पञकाराबरोबर  तुम्हालाही वेठीस धरल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणुन पञकाराबरोबर नागरीकानीही  आत्मपरीक्षण करुन निर्णय घेण्याची काळाची गरज आहे. नाहीतर  पञकारानंतर  तुमच्यावरही वेळ येवु शकते.  भारतीय लोकशाहीचे चार स्तंभ म्हणुन आपण ज्याच्याकडे पाहातो ते चार स्तंभ  [१]संसद [२] न्याय पालीका [३]  प्रशासन [४] प्रसार माध्यम  हे चार स्तंभ एकमेकाला पुरक असुन    देशातील लोकशाही या चार स्तंभावर आहे.     देशातील कायदा व सुव्यवस्थेची बुज राखण्याची जबाबदारी या चार   स्तंभावर आहे.  यातील एकही स्तंभ  कोणाच्या हातचे बाहुले बनला तर  आणि   कुणाच्या आहारी   गेला तर    लोकशाहीचा डोलारा  कोसळायला  वेळ लागणार नाही. म्हणुन नागरीकांनो आणि पञकारांनो  आता   वेळीच सावध होने काळाची गरज आहे.    

पञकार प्रल्हाद दे. आगबोटे , कंधार जि. नांदेड

  मो. ९५६१९६३९३९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *