नौकरीसाठी विद्यार्थ्याची , परीक्षा की शिक्षा ?

गेल्या सत्तर वर्षाच्या काळात, नौकरी साठी अनेक विद्यार्थ्यानी  परीक्षा दिल्या, पण एवढा ञास विद्यार्थ्याना कधीच झाला नाही.  या शासनाच्या काळात नौकरीसाठी परीक्षा देण्यार्‍या विद्यार्थ्याना मोठा ञास सहन करावा लागत आहे. एक प्रकारे  राज्यातील शासन  विद्यार्थ्याचं  शोषन करीत आहे. असे म्हणटले तर वावगे ठरणार नाही. कारण   शासनाकडुन नौकरीचा फाॅर्म भरण्यासाठी  मोठ्या प्रमाणात फीस  आकारली जाते. आणि  मोठ्या प्रमाणात फीस आकारुन सुध्दा शासनाला सुरळीत परीक्षा घेता येत नाहीत.कधी सरवर डावुन  तर कधी पेपर पुटल्याची बोंबाबोंब,  त्यामुळे विद्यार्थ्यां मध्ये  मोठा   मनस्ताप वाढत आहे.ठरलेल्या  वेळेात परीक्षा होतात की नाही. अशी भिती विद्यार्थ्याना वाटु लागली आहे. परीक्षेसाठी  ४००  ते ५००  कि.मी आंतरावरुन  आलेल्या विद्यार्थ्या मध्ये  परीक्षा रदद झाली तर  परीक्षा  पुढे लांबल्या तर पुन्हा तिकिटा साठी  पैशाची जोड  कशी   करावी, पुन्हा परीक्षा केंद्र कूठे येते की, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्या मध्ये निर्मान होत आहेत. विद्यार्थ्यानी    नौकरीचा  फार्म भरता वेळेस अनेक विद्यार्थ्यानी आपल्या गरीबीला पाहुन    जवळचं परीक्षा केंद्र म्हणुन  आपल्या जिल्ह्यातलं परीक्षा केंद्र निवडलं पण विद्यिर्थ्याना आपल्या निवडी प्रमाणे आप आपल्या    जिल्ह्यातलं परीक्षा केंद्र  मिळालं नाही.पण परीक्षा  घेणार्‍या संधीत संस्थेनं   विद्यार्थ्यांना  ४०० ते ५०० कि.मी. अंतरावरील  परीक्षा केंद्र   देवुन  शासनानी विद्यार्थ्याची घोर निराशा केली आहे. कांही विद्यार्थ्याना  तीकीटाच्य पैशा आभावी  परीक्षा पासुन मुकावे लागले  लागले आहे.  परीक्षा घेणार्‍या संबधीत संस्थेने   विद्यार्थ्याचा विचार करायला पाहीजे होता. लांबचे परीक्षा केंद्र  विद्यार्थ्याना परवडेल का? पण त्यानी कोणताही विचार न करता  विद्यार्थ्याना  चारशे ते पाचशे कि.मी अंतरावरील परीक्षा केंद्र  देवुन मोकळे   झाले, पण त्याचा परीनाम विद्यार्थ्याना भोगावा लागला आहे.  त्यामुळे    विद्यार्थीना   दिलेल्या परीक्षा केंद्रावर    एकदिवस आगोदर जावे लागते. विद्यार्थ्याच्या परीक्षा  ज्या शहरात  आहेत  तीथे  गेल्यावर   राञीला राहाण्या साठी विद्यार्थ्याना     लाॅजचे भाडे परवडत नसल्याने अनेक  विद्यार्थ्याना ती राञ कशी घालवावी लागली ते  आता  सांगायला नको अनेक विद्यार्थ्याना वाटु लागले  की ही परीक्षाच नको  बाबा ञास सहन होत नाही. म्हणुन  यावरुन असे स्पष्ट दिसते की,  शासन नौकरीसाठी विद्यार्थ्यांची परीक्षा  घेते  की शिक्षा देते  असे म्हणन्याची वेळ आता    विद्यार्थ्यावर आलेली दिसत आहे.           

       महाराष्ट्र शासनानी यापुढे    शासनाच्या कोणत्याही पदाच्या नौकरभर्ती साठी  परीक्षा घेण्यासाठी कायम स्वरुपी प्रत्येक जिल्ह्यात  एक परीक्षा केंद्र उभाराव,  त्या परीक्षा केंद्रात जवळ पास एका सिप्टला कमीत कमी १५०० विद्यार्थी परीक्षा देतील अशी    बैठक  व्यवस्था करावी   जेने करुन     विद्यार्थ्याना परजिल्ह्यात नौकरीच्या  परीक्षा देण्यासाठी जावे लागनार नाही.   शासनानी  विद्यार्थ्याच्या  नौकरीच्या    परीक्षा  आपआपल्या जिल्ह्यातच घेण्याची   व्यवस्था   केली तर  विद्यार्थ्याना   परीक्षा साठी परजिल्ह्यात जाण्याची  गरज भासनार नाही त्यामुळे  विद्यार्थ्याना   लागणारा खर्च वाचेल, वेळ वाचेल, जेवणाची, राहाण्याची सोय होईल कांही विद्यार्थ्याच्या सकाळी सकाळी परीक्षा असल्यामुळे घरुन परीक्षा केंद्रावर वेळेवर जाता येईल,  मुलींना परजिल्ह्यात जावुन परीक्षा देण्याची गरज भासनार नाही.    मुलींना   त्यांच्या   सुरक्षितेच्या दृष्टीकोणातुन आप आपल्या जिल्ह्यातल  नौकरभर्ती   परीक्षा केंद्र योग्य   राहील त्या मुळे महाराष्ट्र शासनानी  तात्काळ प्रत्येक जिल्ह्यात  नौकर भर्ती  परीक्षा केंद्र उभाराव  त्या परीक्षा केंद्रात  जिल्ह्यातील ग्रामिण भागातुन  आलेल्या विद्यार्थ्याना राहाण्यासाठी एका  सभागृहाची   व्यवस्था करण्यात यावी जेनेकरुन  तिसर्‍या बॅचेसच्या विद्यार्थ्याला परीक्षा देवुन गावी परत जाण्यासाठी उशिर झाला तर त्याला तिथे राहाण्याची    व्यवस्था होईल  यासाठी विद्यार्थ्याना नाममाञ फीस आकारल्यास शासनालाही ते उत्पन्न होईल.

.           शासनानी   शासनाची नौकरभर्ती परीक्षा केंद्र    प्रत्येक जिल्ह्यात  उभारल्यास याच   परीक्षा  केंद्रात शासनाच्या कोणत्याही पदाच्या परीक्षा  याच परीक्षा  केंद्रात घेण्यात याव्यात   शासनानी या परीक्षा केंद्रात   कोणतेही   सामाजिक, राजकिय  कार्यक्रम घेण्यात येवु नये. फक्त    शासनाच्या नौकर भर्तीच्या परीक्षा घेण्या साठीच या परीक्षा केंद्राचा उपयोग करावा. प्रत्येक जिल्ह्यात   नौकरभर्ती परीक्षा केंद्र उभारण्यासाठी शासनाने मंञी मंडळ बैठकीत निर्णय घेवुन प्रत्येक जिल्ह्यात १५०० विद्यार्थी एका सिप्ट मध्ये परीक्षा देतील अशी बैठक व्यवस्था परीक्षा केंद्रात करावी  प्रत्येक जिल्ह्यात नौकरभर्ती परीक्षा केंद्र उभारण्याचा  शासनानी   निर्णय घेतल्यास     विद्यार्थ्याना  परीक्षेसाठी होणारा   ञास सहन करावा लागनार नाही. त्याच बरोबर  महाराष्ट्र शासनानी व राज्याचे मुख्यमंञी एकनाथरावजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंञी अजित दादा पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस साहेब, राज्याचे शिक्षणमंञी दिपक केसरकर साहेब  यानी राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांचा, व मुलींचा विचार करुन प्रत्येक जिल्ह्यात नौकरभर्ती परीक्षा केंद्र उभारण्याचा निर्णय घ्यावा आणि याच नौकरभर्ती परीक्षा   केंद्रात शासनाच्या विविध पदासाठी  घेण्यात येनार्‍या  नौकरीच्या परीक्षा   घेतल्यास विद्यार्थ्याचा वेळ वाचतो, विद्यार्थ्याना  ओढातान करुन परीक्षेसाठी बाहेर  पर जिल्ह्यात   जान्याण्याची   वेळ   येनार   नाही.     नौकर भर्ती कायम  स्वरुपी परीक्षा केंद्र म्हणुन  त्याचा नाव लौकीक होईल,     

     त्याच बरोबर महाराष्ट्र शासनानी   आनखी एक योजना राबवावी की, विद्यार्थ्याना  नौकरीच्या परीक्षेचे फार्म भरण्यासाठी विद्यार्थ्याना  एका वर्षासाठी कमीत कमी २००० रुपय एकदाच फिस आकारुन त्या विद्यार्थ्याला एटीएम सारखे  कार्ड  देण्यात यावे   जेने करुन विद्यार्थ्याना वारोंवार   फाॅर्म भरण्यासाठी पैशाची गरज भासनार नाही. महाराष्ट्रातील  युवकांचे नेते राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे आमदार रोहीत  दादा   पवार  व शिक्षक आमदार कपिल आण्णा    पाटील यानी  प्रत्येक जिल्ह्यात  कायम स्वरुपी    शासकीय नौकरभर्ती परीक्षा केंद्र उभारण्यासाठी शासनाकडे मागनी लावुन धरुन प्रत्येक  जिल्ह्यात शासकीय  नौकरभर्ती  परीक्षा  केंद्र उभारल्यास प्रत्येक जिल्ह्यातील  विद्यार्थ्यांची  परीक्षा     देण्यासाठी गैरसोय हणार नाही.

        महाराष्ट्र शासनानी विद्यार्थ्यांचा  विचार करुन   या दोन्ही योजनेला मान्यता देवुन योजना  आमलात  आनल्यास  प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यासाठी व मुलीं साठी कायम स्वरुपी शासकीय    नौकरभर्ती  परीक्षा  केंद्र  उभारल्यास ते कायमचे   सोयीचे होईल. 

              

 

 

            पञकार प्रल्हाद दे. आगबोटे कंधार

                          जि. नांदेड.

                     मो.९५६१९६३९३९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *