नांदेड ; प्रतिनिधी
नांदेड येथील रहिवासी असलेल्या,प्री प्रायमरी स्कूलच्या संचालिका, कवियत्री व साहित्यिका यांनी आपल्या साहित्यातून सदैव संवेदनशील असे लेखन केलेले आहे. यांच्या लेखनाची व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची दिल्ली येथील
भारतीय दलीत अकादमी तर्फे देण्यात येणारा सन २०२३ या वर्षीचा वीरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार जाहीर झाला आहे.
सौ.रूचिरा शेषराव बेटकर ह्या उच्चशिक्षित असुन शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेहमीच ज्ञानदानाचे पवित्र काम ते करीत असतात. याचबरोबर वेळोवेळी पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी उपक्रम व बाल संगोपन या विषयावर सतत पालकांना मार्गदर्शन करत असतात.
19 फेब्रुवारी 2019 रोजी शैक्षणिक कार्यासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यासह
साहित्यिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. विविध मासिक अंक, दैनिक अंक यात सतत संवेदनशील साहित्यिक लेखन करतात. ९५ वे आ.भा.म.साहित्य संमेलन-२०२२ उदगिर व
९६ वे आ.भा.म.साहित्य संमेलन -२०२३ वर्धा येथे काव्यवाचनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
हा विरांगणा सावित्रीबाई फुले फेलोशिप पुरस्कार दिल्ली येथे दि. १० डिसेंबर २०२३ रोजी देशातील व विदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार असल्याचे पत्रक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोहनलाल सुमनाक्षर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
वीरांगणा सावित्रीबाई फुले फेलोशिप पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल सौ. रुचिरा बेटकर यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.
तसेच या निवडी बद्दल नांदेड जिल्ह्यातील साहित्यिक,शैक्षणिक,सामाजिक,राजकीय आणि मित्र परिवारातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.