देशातील व राज्यातील राजकारणाची पातळी दिवसेदिवस घसरत असून, निती मत्त्येचं राजकारण आता शिल्लक राहाते की नाही. अशी भिती आता सामान्य नागरीकांना वाटु लागली आहे. कारण सध्या राज्यातलं राजकारण पाहाता नगरीकांच्या व राज्याच्या विकासाला बगल देत फोडाफोडीच्या राजकारणाला महत्व आलं आहे. स्व:ता च्या फायद्याच राजकार करण्यात राज्यकर्ते पटाईत झाले आहेत. जिकडे फायदा तिकडे जाण्याचा मानस राज्यकर्त्यांचा झाला असुन, सध्या राज्याच्या राजकारणात मालका पेक्षा चोराला बळ अन् लोकशाहीत राजकारणाचा बट्याघोळ अशी आवस्था सध्या राज्यातल्या राजकारणाची झाली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारानी आत्मपरीक्षन करुन राजकारनाची दिशा बदलण्याची गरज आहे. आम्ही शाळेत शिकलो लोकशाही म्हणजे काय ! लोकांनी लोकांसाठी चालविलेल राज्य म्हणजे लोकशाही होय, पण आता राज्यकर्त्यानी लोकशाहीची व्याख्याच पार बदलून टाकली आहे. लोकानी राज्यकर्त्याना निवडुन द्याव, राज्यकर्त्यानी लोकांना उल्लु बनवाव त्याचा उपयोग राज्यकर्त्यानी स्व:ताच्या फायद्यासाठी पुरेपुर करून घ्यावा.अशी आवस्था सध्याच्या राजकारणातल्या लोकशाहीची झाली आहे. त्यामुळे राज्यातला श्रीमंत माणुस अधिकच श्रीमंत होत आहे. तर गरीब माणुस गरीबच होत आहे. त्यामुळे गरीबी आणि श्रीमंती मध्ये मोठी दरी निर्मान होत आहे. हे आता कुठे तरी थांबले पाहीजे.
महाराष्ट्र ही संताची भुमी आहे.महाराष्ट्रात अनेक महापुरुष होऊन गेले. अनेक महान राज्यकर्ते निर्मांन झाले, महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्रातील राज्यकर्त्याना सत्ताधारी असो की विरोधी पक्षातील नेते मंडळी राजकिय मतभेत बाजुला ठेवुन एका दिलाने केंद्रातल्या सत्ताधार्याना सळो की पळो करुन विकास आपल्या पदरात पाडुन घेण्याच ध्येय त्यांच्या अंगी होतं. त्यानी विकासात कधीच राजकारण आनलं नाही. सर्व मतभेत बाजुला ठेऊन त्यानी विकासाच राजकारण केलं ते दुरदृष्टी नेते होते. दुरदृष्टी आणि सयंमी भुमिका घेवुन महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण केलं महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेल असं राजकारण केलं महाराष्ट्राची शान आणि मान देशात आणि जगात उंचावण्याच काम त्या राज्यकर्त्यानी केले पण महाराष्ट्राची मान शरमेन कधी झुकण्याची वेळ येवु दिली नाही. त्याला राज्यकर्ते म्हणतात.पण सध्याच्या राजकारणात बापात लेक नाही लेकात बाप नाही. बोलण्यात गोडी नाही. प्रेम,आपुलकी, जिव्हाळा , राहिलेला नाही, पक्षनिष्ठा नाही.विकासचं ध्येय धोरन नाही. राजकारणात मतभेद जरुर असावेत पण मनभेद नसावे, ही भुमिका राज्यकर्त्याची आसली पाहिजे राजकारणात कोणी कुणाचा दुष्मन नसतो पण सध्या महाराष्ट्रामध्ये सुडाच राजकारण सुरु आहे.राज्यात कांही पक्षसंघटना .सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण राजकिय पक्षना व कार्यकर्त्याना सांगायचे आहे. स्व:ता च्या फायद्यासाठी राष्ट्रीय एकत्मतेला तडा जानार नाही ही भुमिका प्रत्येक राजकिय पक्षाने घेतली पाहीजे. तरच भारतीय संविधान आणि लोकशाही जिवंत राहील. कांही राज्यकर्ते झटपट श्रीमंत होण्याच्या नादात जिवा भावाच्या मानसाकडे दुर्लक्ष करुन भरपुर मलीदा लाटला आणि राष्ट्रीय तपास यंञनेला घाबरुन पक्ष सोडुन दुसर्या पक्षात प्रवेश करणार्याची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. आम्ही विकासासाठी जात आहोत हे माञ सांगायला विसरत नाहीत. राजकारण कोणत्या दिशेन चालला आहे. आमचां वैभवशाली महाराष्ट्र या महाराष्ट्रात विविध जाती धर्माचे १३ कोटी नागरीक गुण्या गोविंदाने नांदत आहेत पण देशात आणि राज्यात कांही मंडळी द्वेषाच राजकारण करुन धर्मा धर्मात तेढ निर्मान करण्याच प्रयत्न करतात. आशा नेत्याना त्यांची जागा दाखवण्याची आज खरी गरज आहे.तरच देश आणि राज्य एकसंघ राहील
कांही पक्ष संघटना राज्यात सर्व धर्माचे नागरीक एकोप्याने राहात आसताना समाजा मध्ये भितीचे वातावरन निर्मिन करुन धर्मा धर्मात तेढ निर्मान करुन आपले ध्येय साधन्याचा प्रयत्न करीत आहेत. हे आता सुज्ञ नागरीकानी ओळखले पाहिजे आणि अशा संघटने पासुन चार पाऊले दुर राहिले पाहिजे अशा पक्ष संटनेमुळे देशाचे संविधान आणि लोकशाही धोक्यात येवु शकते. सरकार कोणत्याही पक्षाचे असो सरकार येईल जाईल पण भारताचे संविधान आणि लोकशाही सुरक्षित असली पाहिजे या साठी तरुनानी गावा गावात जावुन भारतीय संविधानाचे महत्व पटुन दिले पाहिजे संविधान आपल्यासाठी किती मोलाचे आहे. संविधान सुरक्षित आसेल तर देश सुरक्षित राहू शकतो आणि देश सुरक्षित आसेल तर आपण सुरक्षित राहु शकतो . गेली पंच्याहत्तर वर्षापासुन भारत एकसंघ ठेवण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे. संविधान बदलण्याची भाषा करुन देशातील जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा एक स्टंट आहे. पण संविधान बदलण्याची भाषा करणार्याना सडेतोड पणे आपण उत्तर देवुन सांगितले पाहिजे की तुम्ही काय संविधान बदलता आम्हीच तुम्हाला सत्तेतुन खाली खेचु ही भुमिका आता देशातील प्रत्येक नागरीकानी आणि तरुनानी घेतली पाहिजे ही काळाची गरज आहे. सविधान आणि लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी तरुनानी सतत जागृत आसले
पाहिजे.
पञकार प्रल्हाद दे. आगबोटे कंधार जि. नांदेड
मो.९५६१९६३९३९