कंधार शहरातील विजेच्या समस्या बाबत वंचित बहुजन आघाडी कंधार महिला तालुकाध्यक्षा साधना येंगडे यांचे निवेदन

′कंधार : प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडी कंधार महिला तालुकाध्यक्षा साधना येंगडे व त्यांच्या सहकारी शुभांगी देशमुख यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन कंधार शहरातील विजेच्या समस्या व कंधार शहरचे शाखाधिकारी व जनमित्र हे फोन न उचलणे बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

कंधार शहरात वीज पुरवठा खंडित होत असल्याबाबत महावितरण येथे जाऊन डी वाय राऊत साहेब तसेच नरवटे यांची भेट घेऊन संदर्भात चर्चा करून यावर काही पर्याय सुचवले .
कंधार शहरातील शाखाधिकारी व जनमित्र यांना सुचित करण्यात येते की, ग्राहकांचे वेळोवेळी फोन घेऊन योग्य तो प्रतिसाद द्यावा. तसेच कंधार शहरातील जे सुजाण ग्राहक आहेत अशा ग्राहकांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून वीज प्रवाह खंडित झाल्यास विज वितरण कार्यालयामार्फत सदर ग्रुप वरती मेसेज प्रसारित करावा.
यासाठी सर्व जण मित्रांनी आपल्या कडे असणाऱ्या डी.पी. वरील कमीत कमी दहा ग्राहक सदर व्हाट्सअप ग्रुप वरती ऍड करून घ्यावेत, जेणेकरून आपणास लाईन ब्रेक डाऊन झाल्यावर ग्राहकाचे फोन कॉल्स कमी होतील. आणि आपणास लाईन तत्परतेने चालू करण्यास मदत होईल. अशी चर्चाही करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *